शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

Bihar Assembly Election 2020 Result : त्यामुळे बिहारमध्ये एक्झिट पोलचे अंदाज चुकले, एनडीएच्या बाजूने अनपेक्षित कल आले

By बाळकृष्ण परब | Updated: November 10, 2020 14:33 IST

Bihar Assembly Election 2020 Result News : बिहार विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून राज्यात सत्तापरिवर्तनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून राज्यात सत्तापरिवर्तनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आज मतमोजणीचे कल समोर येऊ लागल्यापासून या सुरुवातीच्या कलांमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीए १३० तर महाआघाडी १०२ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, या कलांमुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा एक्झिट पोलचे अंदाज साफ कसे चुकले याची चर्चा सुरू झाली आहे. आता याचं महत्त्वाचं कारण समोर आलं आहे.बिहारमध्ये मतदान झाल्यानंतर आलेल्या काही एक्झिट पोलमधून तेजस्वी यादव यांच्या एकतर्फी विजयाचे भाकित करण्यात आले होते. तर काही एक्झिट पोलनी महाआघाडीला स्पष्ट बहुमताचा कल वर्तवला होता. मात्र मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांनंतर मात्र एक्झिट पोलच्या अगदीच विपरित आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये महाआघाडीऐवजी एनडीएला आघाडी मिळाली आहे. एक्झिट पोलच्या अगदी विरोधात निकाल लागण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बिहारमधील सायलेंट व्होटर असल्याचे सांगण्यात येत आहे.सायलेंट व्होटर किंवा बिहारी भाषेत चुप्पा व्होटर म्हणजे जो मतदार गुपचूप मतदान करून येतो. हा मतदार आपले मत जाहीर करत नाही. तसेच त्याबाबत कुठेही आपली भूमिका जाहीर करत नाही. यावेळी या मतदाराने आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआघाडीला मतदान न करता भाजपा-जेडीयूच्या एनडीएला मतदान केले. या मतदारांनी २०१५ मध्ये आरजेडी आणि जेडीयूच्या आघाडीला मतदान केले होते.२०१५ मध्येसुद्धा एक्झिट पोलमधून भाजपाच्या विजयाचे भाकित करण्यात आले होते. काही एक्झिट पोलनी तर भाजपाच्या एकतर्फी विजयाचा अंदाज वर्तवला होता. मात्र प्रत्यक्ष निकालांमध्ये नितीश कुमार आणि लालूंच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने एकतर्फी विजय मिळवला होता.सायलेंट व्होटरमध्ये कुणाचा आहे समावेश?हा सायलेंट व्होटर म्हणजे नेमके कुठले मतदार हा प्रश्न पडू शकतो. तर या सायलेंट व्होटरमध्ये महिला आणि मागास जातींमधील मतदारांचा समावेश होतो. हे मतदार उघडपणे आपलं मत व्यक्त करत नाहीत किंवा त्यांना मत व्यक्त करता येत नाही. मात्र हे मतदार गुपचूप आपले मत देऊन येतात. त्यामुळे त्यांच्या मताचा कल मिळवणे कठीण होते.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीNitish Kumarनितीश कुमार