शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Bihar Assembly Election 2020 : बिहारमध्ये प्रचारादरम्यान उमेदवाराची हत्या, समर्थकांनी हल्लेखोराला केले ठार

By बाळकृष्ण परब | Updated: October 25, 2020 06:44 IST

Bihar Assembly Election News : उमेदवार श्रीनारायण सिंह हे प्रचाराला निघाले असताना एका हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला.

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडत आहेत. बिहारमधील शिवहर येथे शनिवारी एका उमेदवाराची आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सदर उमेदवार प्रचाराला निघाला असताना एका हल्लेखोराने त्याच्यावर गोळीबार केला. दरम्यान, या हल्लेखोराला उमेदवाराच्या समर्थकांनी घटनास्थळावरच पकडून जबर मारहाण केली. या मारहाणीत या हल्लेखोराचाही मृत्यू झाला.शिवहर विधानसभा मतदारसंखात जनता दल राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनारायण सिंह हे शनिवारी प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. श्रीनारायण सिंह हे पुरनहियामधील हथसार गावात लोकांच्या  भेटीगाठी घेत होते. त्याचदरम्यान, दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे घटनास्थळावर पळापळ झाली. दरम्यान, छातीत गोळी घुसल्याने श्रीनारायण सिंह घटनास्थळावरच रक्ताच्या थारोळ्यात पडले.हल्ला करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वारावर तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या जमावाने पकडले. हल्लेखोराला पकडल्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.गंभीर जखमी झालेल्या श्रीनारायण सिंह यांना उपचारांसाठी शिवहर सदर रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारांसाठी सीतामढी येथे नेण्यास सांगितले. मात्र तिथे नेत असतानाच श्रीनारायण सिंह यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या वृत्तामुळे कार्यकर्त्यांमध्ये शोकसंतप्त वातावरण आहे.दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे. शिवहरचे एसडीपीओ राकेश कुमार यांनी सांगितले की, आरोपी हे उमेदवाराचे समर्थक बनून गर्दीत घुसले होते. संधी पाहताच त्यांनी गोळीबार केला. दरम्यान, या प्रकरणात फरार असलेल्यांचा शोध सुरू आहे. मयत श्रीनारायण सिंह हेसुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. त्यांच्यावर दोन डझनांहून अधिक गुन्हे दाखल होते.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकCrime Newsगुन्हेगारीBiharबिहार