शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

"आता कोणताही माफिया कोणालाही धमकावू शकत नाही", अतीक-अशरफच्या हत्येनंतर योगी आदित्यनाथ यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 14:27 IST

लोकभवन येथे पीएम मित्र योजनेअंतर्गत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासमोर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी योगी आदित्यनाथ बोलत होते.

गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, आता उत्तर प्रदेशात दंगली होत नाहीत. उत्तर प्रदेशात आता कायद्याचे राज्य आहे. तसेच, आता कोणतेही व्यावसायिक गुन्हेगार आणि माफिया कोणत्याही उद्योजकांना धमकावू शकत नाहीत, उत्तर प्रदेश आज तुम्हाला सर्वोत्तम कायदा आणि सुव्यवस्थेची हमी देतो, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

मंगळवारी लोकभवन येथे पीएम मित्र योजनेअंतर्गत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासमोर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी योगी आदित्यनाथ बोलत होते. ते म्हणाले, जे माफिया आधी संकट होते, तेच आता संकटात आले आहेत. उत्तर प्रदेशात  आमच्या सरकारमध्ये एकदाही कर्फ्यू लागू करण्यात आलेला नाही. आता कोणत्याही जिल्ह्याच्या नावाची भीती नाही. उत्तर प्रदेश आता विकासासाठी ओळखला जातो. यापूर्वी उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली होती, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. 

गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली. या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये रुटीन हेल्थ चेकअपसाठी नेत असताना हा प्रकार घडला. यानंतर पोलिसांनी अतीक अहमद आणि अशरफ अहमद यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघांनीही अटक केली आहे. दरम्यान, अतीक अहमद आणि अशरफ अहमद यांना 2005 मधील उमेश पाल हत्याकांड प्रकरणी, प्रयागराज येथे एका न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आले होते. यापूर्वी, 13 एप्रिलला झांसी जिल्ह्यातील परीछा डॅम भागात अतीकचा मुलगा असद आणि मुहम्मद गुलाम यांचा पोलीस एनकाउंटरमध्ये मृत्यू झाला होता.   17 पोलील कर्मचाऱ्यांरी निलंबित  अतीक अहमद आणि अशरफच्या हत्येनंतर, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या 17 पोलील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. याचबरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानाची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. याशिवाय, अतिक आणि अशरफच्या हत्येनंतर, प्रयागराजमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच, परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश