शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मिझोरममध्ये अटक केलेल्या परदेशी नागरिकांबाबत मोठा खुलासा; NIA कडून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 15:41 IST

सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू!

मिझोरममध्ये बेकायदेशीर प्रवेश आणि संशयास्पद हालचालींप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 7 परदेशी नागरिकांबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. यूक्रेनचे 6 आणि अमेरिकेचा 1 नागरिक अटकेत असून, ते भारताचा वापर करून म्यानमारमध्ये जाण्यासाठी ‘ट्रांझिट कॉरिडॉर’ तयार करत होते. एवढेच नाही तर तो ड्रोन आणि आधुनिक युद्ध तंत्राचे प्रशिक्षणही देत ​​होते, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. 

या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी एनआयएच्या दोन टीम स्लीपर सेल मॉड्यूलच्या शोधात मिझोरम-म्यानमार सीमेवर पोहोचल्या आहेत. या संवेदनशील प्रकरणाची चौकशी करणाऱ्या केंद्रीय संयुक्त तपास पथकाला माहिती मिळाली की, या मॉड्यूलला मिझोराम-म्यानमार सीमेवरील स्थानिक नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळाला होता. हे नागरिक भारत आणि म्यानमार या दोन्ही देशातील आहेत. केंद्रीय तपास पथकही म्यानमारच्या तपास यंत्रणांच्या संपर्कात असून, येत्या काही दिवसांत आणखी काही मोठ्या अटकेची शक्यता आहे.

तपासादरम्यान या आरोपींकडून ड्रोन आणि आधुनिक युद्धतंत्राचे प्रशिक्षण दिल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, त्यांचे भारतविरोधी किंवा प्रतिबंधित संघटनांशी संबंध असू शकतात, अशीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्रकरणात गुप्तहेरगिरीचा कोनही तपासात समाविष्ट करण्यात आला आहे. तपासात असेही समोर आले आहे की ‘मॅथ्यू’ नावाचा एक अमेरिकन नागरिक परदेशातील काही ख्रिश्चन संस्था आणि धार्मिक गटांकडून देणगी गोळा करत होता. ही रक्कम सामाजिक आणि धार्मिक कार्यांसाठी घेतली जात असल्याचे सांगितले जात होते; मात्र त्यातील काही निधी भारत-म्यानमार सीमेवरील बंडखोर गटांकडे वळवण्यात आल्याचा संशय आहे. 

अशीही माहिती समोर आली आहे की, काही विदेशी भाडोत्री लढवय्ये म्यानमारमधील गृहयुद्धात सहभागी होण्यासाठी भारताचा मार्ग वापरत होते. हे लढवय्ये नेमके कोणासाठी काम करत होते, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये यूक्रेनचा मारियन स्टेफानकिव याचाही समावेश असून, त्याला डोनबास संघर्षाचा अनुभव असल्याचा संशय आहे. तथापि, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. सध्या सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणामागील संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mizoram: NIA Investigates Foreign Nationals' Arrest, Myanmar Link Suspected

Web Summary : NIA probes foreign nationals arrested in Mizoram for illegal entry and suspected Myanmar links. They allegedly planned a transit corridor, provided drone training, and received funds diverted to rebel groups. Further arrests are expected.
टॅग्स :mizoram-pcमिजोरमAmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारीMyanmarम्यानमार