शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींना दिलासा! लोकसभेतील निलंबन रद्द; विशेषाधिकार समितीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 16:32 IST

Congress MP Adhir Ranjan Chowdhury: अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन मागे घेण्याची शिफारस करणारा ठराव विशेषाधिकार समितीने मंजूर केला आहे.

Congress MP Adhir Ranjan Chowdhury:संसदेचे पावसाळी अधिवेशन अनेक कारणांनी गाजले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होत अधीर रंजन चौधरी यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली होती. मात्र, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना नीरव मोदीशी केली होती. यामुळे अधीर रंजन चौधरी यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, आता अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने याबाबतचा निर्णय घेतला आहे. 

अधीर रंजन चौधरी यांच्या भाषणाचा वादग्रस्त भाग संसदेच्या रेकॉर्डवरून हटविण्यात आला होता. परंतु, त्याच्या पुढच्याच दिवशी चौधरी यांना  निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण लोकसभेच्या विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले होते. लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन रद्द केले आहे. हे निलंबन मागे घेण्याची शिफारस करणारा ठराव विशेषाधिकार समितीने मंजूर केला आहे. याने अधीर रंजन चौधरी यांना मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे. 

अधीर रंजन चौधरींनी व्यक्त केला खेद

अधीर रंजन चौधरी लोकसभेच्या विशेषाधिकार समितीसमोर हजर झाले. यावेळी अधीर रंजन चौधरी यांनी केलेल्या विधानाबाबत खेद व्यक्त केला. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. मी माझ्या वक्तव्याप्रकरणी खेद व्यक्त करतो, असे अधीर रंजन चौधरी यांनी विशेषाधिकार समितीला सांगितले, अशी माहिती भाजप खासदार सुनील कुमार सिंह यांनी दिली. सुनील कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशेषाधिकार समितीने अधीर रंजन चौधरी यांना म्हणणे मांडण्यासाठी निमंत्रित केले होते. 

दरम्यान, समितीने अधीर रंजन चौधरी यांचे लोकसभेतील निलंबन मागे घेण्याचा ठराव मंजूर केला आहे. हा ठराव लवकरात लवकर लोकसभा अध्यक्षांकडे पाठवला जाईल, अशी माहिती विशेषाधिकार समितीतील एका सदस्याने दिली. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी अधीर रंजन चौधरी यांना निलंबित करण्याबाबतचा ठराव मांडला होता. पावसाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री संसदेला संबोधित करत असताना अधीर रंजन चौधरी यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या विरोधात आणलेला अविश्वास ठराव फेटाळताच सरकारने अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता, जो लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाला. यानंतर हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आले.

 

टॅग्स :Parliamentसंसदcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा