शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

मोठा दिलासा! लोन मोरेटोरियमचे व्याज सरकार भरणार; कर्जदार सुखावले

By हेमंत बावकर | Updated: October 3, 2020 12:01 IST

EMI moratorium : आरबीआयने आधी तीन महिने आणि नंतर तीन असे सहा महिने ईएमआय दिलासा दिला होता. 31 ऑगस्टला ही मुदत संपली होती. याकाळात अनेकांचा कोरोना संकटामुळे रोजगार गेला होता. त्यानंतरही त्यांना नोकरी किंवा रोजगार मिळण्याची शक्यता कमीच होती. यामुळे सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने याचिका दाखल केली होती.

कोरोना काळात देशभरात लॉकडाऊन केल्यानंतर आरबीआयने लोन मोरेटोरिअम जाहीर केला होता. यामुळे या काळात नोकरी गमावलेल्या किंवा रोजगार गमावलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, बँकांनी या काळातील चक्रवाढ व्याज आकारण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे थकलेल्या ईएमआयपेक्षा कितीतरी अधिक पटींनी या व्याजाचा भुर्दंड ग्राहकांना बसणार होता. यावर आता मोठा दिलासा मिळाला आहे.

आरबीआयने आधी तीन महिने आणि नंतर तीन असे सहा महिने ईएमआय दिलासा दिला होता. 31 ऑगस्टला ही मुदत संपली होती. याकाळात अनेकांचा कोरोना संकटामुळे रोजगार गेला होता. त्यानंतरही त्यांना नोकरी किंवा रोजगार मिळण्याची शक्यता कमीच होती. यामुळे सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने याचिका दाखल केली होती. यावर केंद्राने तो बँकांचा विषय असल्याचे म्हटले होते. यावर न्यायालयाने केंद्र सरकार, आरबीआय जबाबदारीपासून पळू शकत नाहीत, असे सुनावले होते. तसेच पुढील वेळी पूर्ण नियोजन करून या, असेही सांगितले होते. 

यावर केंद सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे. यामध्ये बँक कर्ज आणि क्रेडिट कार्डच्या मोरेटोरियमवर अतिरिक्त व्याज माफ केले जाणार असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच एमएसएमई, एजुकेशन, होम, कंज्यूमर, ऑटो लोनवर लागू केलेले चक्रवाढ व्याज वसूल केले जाणार नाही. तसेच क्रेडिट कार्डवरील व्याजही वसूल केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या बाबतचे वृत्त आज तकने दिले आहे.

चक्रवाढ व्याजाचे गणित कसे होते?आरबीआयच्या सूचना सर्वात आधी एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक अंमलात आणते. पण या बँकेनेच ही माहिती देऊन ईएमआय दिलासा घेऊ इच्छिणाऱ्यांची झोप उडविली होती. एसबीआयने त्यांच्या वेबसाईटवर एक लिंक दिली आहे. यावर त्यांनी हा ईएमआय दिलासा म्हणजेच न भरण्याची सूट दिल्याचे म्हटले होते. तसेच ही योजना कशी लागू होईल याबाबतही सांगितले होते. यामध्ये त्यांनी वाहन आणि गृह कर्ज अशी दोन उदाहरणे दिली आहेत. 

  • जर तुम्ही ६ लाखांचे वाहन कर्ज ५४ महिन्यांच्या मुदतीचे घेतले असेल आणि आरबीआयनुसार तीन महिन्यांचा दिलासा घेतला तर तुमच्या कर्जाला मुदतवाढ मिळणार आहे. तसेच या काळातील एकूण कर्जाच्या रकमेवर तब्बल १९००० रुपये व्याज आकरले जाण्याची शक्यता आहे. ही रक्कम तुमच्या कारच्या हप्त्याच्या दीड पट असणार होती. 
  •  
  • जर तुम्ही ३० लाखांचे १५ वर्षांच्या मुदतीचे गृहकर्ज घेतले असेल तर तुम्हाला तीन महिन्यांचे एकून कर्जाच्या रकमेचे व्याजच २.३४ लाख रुपये भरावे लागणार आहे. हे व्याज म्हणजे तुमचे घराचे ८ हप्ते असणार होती.
  •  
  • एकूणच काय तर तुम्ही तीन हप्ते टाळण्यासाठी किंवा सूट घेण्याचा हव्यास धरलात तर वाहनाचे दीड महिन्याचाच EMI दिलासा मिळणार आहे. तर घराचे कर्ज असलेल्यांना तर तीन महिन्यांचे हप्ते आणि व्याजाचे ८ महिन्यांचे हप्ते असे ११ हप्ते जादा भरावे लागणार होती. 
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकcorona virusकोरोना वायरस बातम्या