शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 20:27 IST

Air India Plane News: तामिळनाडूमधील त्रिची विमानतळावरून शारजाहकडे जात असलेल्या एअर इंडियाच्या विमानामध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर अथक प्रयत्नांनंतर हे विमान सुरक्षितरीत्या धावपट्टीवर उतरवण्यात यश आलं.

तामिळनाडूमधील त्रिची विमानतळावरून शारजाहकडे जात असलेल्या एअर इंडियाच्याविमानामध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. उड्डाण केल्यानंतर लगेचच विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टिममध्ये काहीतरी गंभीर बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर दोन तास हे विमान विमानतळाच्या आसपास घिरट्या घालत  होते.  या विमानामधून सुमारे १४० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. अखेर या विमानाला विमानतळावर सुखरूप उतरवण्यात यश आले आहे.

या घटनेमुळे विमानतळावर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच संभाव्य धोका लक्षात घेऊन विमानतळावर अग्निशमन दलाच्या १८ बंबांना पाचारण करण्यात आले  होते. विमानामध्ये इंधनाचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने इंधन कमी झाल्यानंतर हे विमान धावपट्टीवर उतरवण्याचा प्रयत्न केला जाणार असे सांगण्यात येत होते. अखेरीस हे विमान सुखरूप उतरवण्यात यश आलं. 

विमानामधील हायड्रॉलिक सिस्टिम बिघडल्याचे निदर्शनास आल्यानंतर वैमानिकाने हे विमान त्रिची विमानतळावर उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले. वैमानिकाने पूर्ण आणीबाणीची परिस्थिती घोषित केली होती. त्यानंतर विमानतळावरील कर्मचारी या समस्येवर तोडगा काढून विमानाला सुरक्षित धावपट्टीवर उतरवून प्रवाशांना सुखरूप उतरवण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होते. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानAirportविमानतळ