शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: UGCच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती, सरन्यायाधीश म्हणाले, होऊ शकतो दुरुपयोग  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 14:28 IST

Supreme Court Stays UGC's New Rules: वादग्रस्त ठरलेल्या यूजीसीच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नवे नियम हे अस्पष्ट असून, या नियमांचा दुरुपयोग होऊ शकतो, असे निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवले आहे.

वादग्रस्त ठरलेल्या यूजीसीच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नवे नियम हे अस्पष्ट असून, या नियमांचा दुरुपयोग होऊ शकतो, असे निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटिस, बजावली असून, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही १९ मार्च रोजी होणार आहे. यूजीसीने लागू केलेल्या नव्या नियमांमवरून देशभरात आणि विशेषकरून उत्तर भारतात संताप व्यक्त होत. होता तसेच या नियमांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.  

यूजीसीच्या नव्या नियमांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती ज्योमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, यूजीसीच्या नियमांमधील सेक्शन ३सी हे जाती आधारित भेदभावाला केवळ एससी, एसटी आणि ओबीसींपर्यंतच मर्यादित करतं, तसेच सामान्य वर्गाला या तरतुदींच्या बाहेर ठेवतं. ही बाब कलम १४ मध्ये देण्यात आलेल्या समानतेच्या अधिकारांच्या विरोधाात आहे. तसेच ही व्याख्या घटनेची भावना आमि सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या आदेशांच्या विरोधात आहे. तसेच या नियमांमुळे समाजात वैमनस्य वाढेल, असा दावाही याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला.   

त्यानंतर प्रकरणी सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनंतरही आपण समाजाला जातीपातींपासून मुक्त करू शकलेलो नाही. आता या कायद्यांमधून आपण समाजाला आणखी मागे घेऊन जात आहोत का? अशी  महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. 

दरम्यान, नव्या नियमांमुळे रॅगिंग वाढणार असून, रॅगिंकरणारे विद्यार्थी तक्रारही करतील, अशी भीती याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली. त्यावर न्यायमू्र्ती बागची यांनी सांगितले की, राज्य घटना राज्याला एससी एसटींसाठी विशेष कायदे बनवण्याचा अधिकार देते. जर २०१२ च्या नियमांमध्ये व्यापक संरक्षण देण्याचा उल्लेख करण्यात आला असेल तर समाजिक न्यायाचं संरक्षण करणाऱ्या कायद्यांमध्ये बचावाचे उपायही असले पाहिजेत. अमेरिकेप्रमाणे शाळांनाच वेगळं करण्याच्या पातळीपर्यंत आपण जाता कामा नये, असेही न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court Stays UGC's New Rules, Cites Potential Misuse

Web Summary : The Supreme Court has stayed the controversial new UGC rules, citing ambiguity and potential for misuse. The court issued a notice to the central government, with the next hearing scheduled for March 19. The rules had sparked widespread opposition, particularly in North India.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEducation Sectorशिक्षण क्षेत्र