शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 14:31 IST

Nimisha Priya News: येमेनमधील तुरुंगात कैदेत असलेली भारतातील केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तूर्तास टळली आहे.

येमेनमधील तुरुंगात कैदेत असलेली भारतातील केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तूर्तास टळली आहे. निमिषा प्रिया १६ जुलै रोजी येमेनमधील तुरुंगात फाशी देण्यात येणार होती. मात्र भारत सरकारकडून मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सुरू असलेले प्रयत्न आणि पडद्यामागून घडलेल्या घडामोडींनंतर निमिषा प्रिया हिला देण्याात येणाऱ्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी टळली आहे.

केरळच्या पालक्कड जिल्ह्यातील कोल्लेंगोडे येथील रहिवासी असलेली निमिषा प्रिया २००८ मध्ये रोजगारासाठी येमेनला गेली होती. दरम्यान, २०१७ साली तलाल अब्दो महदी या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. तलाल हा निमिषाचा व्यवसायातील भागीदार होता. दरम्यान, २०२० मध्ये तिला दोषी ठरवण्यात आलं होतं. तसेच तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेची अंमलबजावणी १६ जुलै रोजी होणार होती.

दरम्यान, निमिषा हिला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा टाळण्यासाठी भारतामधून सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते. तसेच निमिषाने हत्या केलेल्या तलाल अब्दो महदी याच्या नातेवाईकांना स्थानिक कायद्यांनुसार ब्लड मनी देण्याचा प्रस्तावही देण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव त्यांनी नाकारला होता. याचदरम्यान, भारताचे ग्रँड मुफ्ती कंठपुरम एपी अबूबकर मुसलियार यांनीही या प्रकरणी पुढाकार घेतला होता. तसेच ग्रँड मुफ्तींच्या विनंतीनंतर येमेनमध्ये या प्रकरणावर विचारविनिमय सुरू झाला होता. या प्रयत्नांचं नेतृत्व येमेनचे प्रसिद्ध सुफी विद्वान शेख हबीब उमर करत होते. शेख हबीब यांचे प्रतिनिधी हबीब अब्दुर्रहमान अली मशहूर यांनी उत्तर यमनमध्ये एका तातडीच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत त्यांनी येमेनी सरकारचे प्रतिनिधी, फौजदारी न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश, तलालचा भाऊ आणि आदिवासी नेत्यांशी चर्चा केली होती. त्याशिवाय भारत सरकारकडून इतर मार्गांनीही निमिषाची फाशी टाळण्यासाठी प्रयत्न सुरू होते. 

टॅग्स :KeralaकेरळCrime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीय