शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 20:34 IST

या प्रकरणामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत जेडीएससह मित्रपक्ष असलेल्या भाजपचीही मोठी अडचण झाली आहे.

H D Revanna ( Marathi News ) : शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये अडकलेले माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र आणि जेडीएसचे नेते एचडी रेवन्ना यांना कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने अटक केली आहे. एका पीडित महिलेच्या अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत जेडीएससह मित्रपक्ष असलेल्या भाजपचीही मोठी अडचण झाली आहे.

मैसूर येथील एका महिलेच्या अपहरणाची तक्रार मागील गुरुवारी दाखल करण्यात आली होती. सदर महिला लैंगिक शोषण प्रकरणातील पीडिता असल्याचं बोललं जात आहे. "माझी आई मागील सहा वर्षांपासून एचडी रेवन्ना यांच्या घरी आणि फार्महाऊसवर काम करत होती. मात्र तीन वर्षांपूर्वी ती हे काम सोडून आपल्या गावात मजुरीचं काम करू लागल्या.  काही दिवसांपूर्वी त्यांचा परिचीत असलेला  सतीश नावाचा व्यक्ती आला आणि माझ्या आईला घेऊन गेला. काही दिवसांनंतर त्याने आईला घरी आणून सोडलं. त्यानंतर २९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता सतीश हा पुन्हा आमच्या घरी आला. रेवन्नाने तुला आणायला सांगितलं आहे, असं सांगून तो पुन्हा माझ्या आईला घेऊन गेला. त्यानंतर १ मे रोजी सतीशचा एक मित्र आमच्या घरी आला आणि त्याने सांगितलं की तुमच्या आईचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तुझ्या आईचं लैंगिक शोषण केलं जात असल्याचं त्याने मला सांगितलं," असं या महिलेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं होतं.

दरम्यान, याप्रकरणी आता कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने एचडी रेवन्ना यांना अटक केली असून अधिक तपास केला जात आहे

राहुल गांधींनी केलं PM मोदींना लक्ष्य

कर्नाटकातील लैंगिक शोषण प्रकरणावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. "प्रज्वल रेवण्णा प्रकरणामुळे पंतप्रधान आता कर्नाटकमध्ये यायला घाबरत आहेत, त्यांनी सर्व जाहीर सभा रद्द केल्या आहेत. कर्नाटकात येऊन रेवण्णाबद्दल देशाला सांगा. प्रज्वल रेवण्णा प्रकरण भाजप नेत्यांना माहीत होते आणि देशाबाहेर पळून जाण्यात रेवण्णा यांना मदत करण्यात आली," असा आरोप राहुल गांधी यांनी नुकताच एका जाहीर सभेतून केला आहे.

 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारण