शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

Covaxin for Childrens: मोठी बातमी! आता लहान मुलांच्या 'Covaxin' ची दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 08:55 IST

Bharat Biotech Covaxin 2-18 Years vaccination trials approval soon: अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीची चाचणी दिल्ली आणि पटनाच्या एम्समध्ये आणि नागपुरच्या मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूटसह विविध ठिकाणी केली जाणार आहे. एक्सपर्ट समितीने मंगळवारी शिफारस केली आहे.

Bharat Biotech Covaxin for Childrens: नवी दिल्ली : अमेरिकेने 12 ते 15 वयोगटाच्या मुलांसाठी फायझरच्या लसीला लसीकरणासाठी (Corona Vaccination) परवानगी दिलेली असताना आता भारतातूनही एक आनंदाची बातमी येत आहे. देशात कोरोना महामारीविरोधात लढ्यामध्ये लहान मुलांसाठी भारत बायोटेक (Bharat Biotech) लस बनवत आहे. 2 ते 18 वयोगटातील बालके आणि मुलांच्या या लसीच्या दुसऱ्या/तिसऱ्य़ा टप्प्यातील चाचण्यांसाठी एक्सपर्ट समितीने मंगळवारी शिफारस केली आहे. (Covaxin’ for phase II and phase III clinical trial on children between the age of two and 18 years.)

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीची चाचणी दिल्ली आणि पटनाच्या एम्समध्ये आणि नागपुरच्या मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूटसह विविध ठिकाणी केली जाणार आहे. केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ) च्या कोरोनावरील तज्ज्ञांच्या समितीने मंगळवारी भारता बायोटेकने दिलेल्या अर्जावर चर्चा केली. यामध्ये भारत बायोटेकने बनविलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या दोन ते 18 वर्षांच्या मुलांमध्ये सुरक्षा आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासह अन्य गोष्टींचे आकलन करणे आणि चाचणीच्या दुसऱ्या/ तिसऱ्या टप्प्याला परवानगी देणे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. 

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे वृत्तपत्र न्यू यॉर्क टाईम्सने अशी बातमी दिली होती की, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (18+) बदलणाऱ्या कोरोना व्हायरसविरोधात अँटबॉडी बनविण्यास प्रभावी आहे. काही दिवसांपूर्वी तिसऱ्या चाचणीचे निकाल घोषित करण्यात आले. आयसीएमआर आणि भारत बायोटेकने ही लस विकसित केली आहे. सामान्य कोरोना रुग्णांवर कोरोनाची लस ही 78 टक्के प्रभावी आहे, असे म्हटले होते.  अमेरिकेत उद्यापासून 12-15 वयोगटासाठी लसीकरणकोरोना महामारीच्या (Corona Virus) विरोधात सुरु असलेल्या लढ्याला अमेरिकेमधून मोठी दिलासादायक बातमी येत आहे. फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीला (Corona Vaccine) मान्यता दिली आहे. फायझर-बायोएनटेकने ही कोरोना लस (Pfizer-BioNTech COVID Vaccine) बनविली आहे. ही लस किशोरवयीनांना दिली जाणार आहे. गुरुवारपासून अमेरिकेत या वयोगटासाठी लसीकरण सुरु होऊ शकते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कंपन्यांनी ही लस मुलांसाठी १०० टक्के यशस्वी ठरल्याचा दावा केला होता. लस घेतल्यानंतर कोणतेही 'साइड इफेक्ट' देखील होत नसल्याचं कंपनीनं म्हटले होते. या लसीला साधारण दीड महिन्यांनी अमेरिकेने परवानगी दिली आहे. एफडीएचे कार्यवाहक आय़ुक्त जेनेट वुडकॉक यांनी या पावलाला कोरोना महामारीविरोधातील महत्वाचा टप्पा म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस