शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचा मोठा निर्णय! दहशतवाद्यांना संपविण्यासाठी कुपवाडात सीआरपीएफचे कोब्रा कमांडो तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 19:44 IST

दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्यात तीन महत्वाचे अधिकारी शहीद झाले होते.

दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्यात तीन महत्वाचे अधिकारी शहीद झाले होते. यानंतर जंगलात अड्डे बनविलेल्या  दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय सैन्य आणि जम्मू पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. यातच दहशतवाद्यांनी जंगलांना अड्डे बनविल्याने आता कोब्रा कमांडोंनाच उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोब्रा कमांडोंच्या पहिल्या बॅचने नुकतेच जम्मूच्या जंगलात प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या कमांडोंना कुपवाडामध्ये तैनात करण्यात आले आहे.

संसदेत माझे ८०० भाऊ; इरिगेशन घोटाळा चौकशीवरुन सुप्रिया सुळेंनी गाजवलं भाषण

२००९ मध्ये कमांडो बटालियन फॉर  रिझोल्युट अॅक्शन (CoBRA) ची माओवादी बंडखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी स्थापना करण्यात आली होती. आता त्यांना पहिल्यांदाच मध्य आणि पूर्व भारतातून काढून जम्मू-काश्मीरला पाठवण्यात आले आहे.

सीआरपीएफच्या कोब्रा कमांडो फोर्सची एक विशेष तुकडी जम्मू-काश्मीरमध्ये पाठवली आहे. जंगल आणि पर्वतांमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या आणि सुरक्षा दलांवर हल्ला करण्याच्या पद्धतींवर कोब्रा विशेष नजर ठेवून आहे. दहशतवाद्यांविरोधात कारवाईची गरज भासल्यास तेथे उपस्थित असलेल्या दलांनाही त्याची मदत होईल. कोब्रा कमांडोना जंगल युद्धात नैपुण्य आहेत.

गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी जम्मू-काश्मीरच्या जंगलात आणि पर्वतांमध्ये लपून सुरक्षा दलांवर हल्ले करत आहेत. कोब्रा कमांडोंना जंगलात लढण्याचे कौशल्य आहे, त्यामुळे ते जम्मू-काश्मीरच्या जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊ शकतात.

बिहार आणि झारखंड येथील कोब्रा टीमला हलवण्यात आले आहे. तेथील नक्षलवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सहा महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या जंगलात त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. आता प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यांना कुपवाडा येथे तैनात करण्यात आले आहे, तरीही अद्याप कोणत्याही कारवाईत त्यांचे सहकार्य घेण्यात आलेले नाही. 

सोमवारी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात बंदी घातलेल्या हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या तीन ओव्हर-ग्राउंड वर्कर यांना PSA अंतर्गत ताब्यात घेण्यात आले. अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तौसिफ-उल-नबी, झहूर-उल-हसन आणि रियाझ अहमद यांना ताब्यात घेण्यात आले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर