शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला मोठा धक्का, आणखी एका दिग्गज युवा नेत्याने दिली पक्षाला सोडचिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 13:13 IST

Congress: काँग्रेस नेते आणि देशातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी. राजगोपालचारी यांचे पणतू सी. आर. केसवन यांनी आज सकाळी पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

काँग्रेस नेते आणि देशातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी. राजगोपालचारी यांचे पणतू सी. आर. केसवन यांनी आज सकाळी पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना संबोधित करत आपला राजीनामा सोशल मीडियावरून शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी पक्ष सोडण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

केसवन यांनी लिहिले की, मला हे सांगताना दु:ख होते की, गेल्या काही काळापासून मी त्या मूल्यांचे कुठलेही अवशेष पाहिलेले नाहीत, ज्यांनी मला पक्षाप्रति समर्पणासह दोन दशकांपासून अधिक काळापर्यंत काम करण्यासाठी प्रेरित केले. त्यामुळेच मी हल्लीच राष्ट्रीय स्तरावर संघटनात्मक जबाबदारीला नकार दिला होता. तसेच भारत जोडो यात्रेपासून दूर राहिले होते.

सर्वात जुन्या पक्षाला रामराम ठोकताना त्यांनी सांगितले की, ही माझ्यासाठी नवा मार्ग  निवडण्याची वेळ आहे. त्यामुळे मी तत्काळ प्रभावाने काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मी कुठल्याही इतर पक्षामध्ये जाईन याबाबत अंदाज व्यक्त केला जाईल. मात्र स्पष्टपणे सांगायचं तर मी कुणाबरोबरही बोललो नाही आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर पुढे काय करावं लागेल, हे मला माहिती नाही आहे.

केसवन यांनी पत्रामध्ये लिहिले की, सरकार आणि संघटनेने अनेक वर्षांपूर्वी मला सोपवलेल्या जबाबदाऱ्यांसाठी पक्ष आणि श्रीमती सोनिया गांधी यांचे आभार मानतो. ते पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सर्जिकस स्ट्राइकचे पुरावे मागितले. ही बाब खूप निराशाजनक आहे. मला वाटते की, माझी काम करण्याची पद्धत ही पक्षाशी अनुरूप अशी नाही आहे. त्यामुळेच मी भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालो नाही. मला वाटते की आता माझं या पक्षात काही काम राहिलेलं नाही आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण