शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नीरज चोप्राच्या भाल्याला १ कोटी ५० हजारांची बोली; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटवस्तूचा लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 05:44 IST

PM Narendra Modi Gifts Auction: धार्मिक, ऐतिहासिक वस्तूंनाही मागणी, पॅरालिम्पिकमध्ये भारताचा सुवर्णपदक विजेता खेळाडू सुमित अंतील याने वापरलेल्या भाल्याची लिलावात मूळ बोली १ कोटी रुपयांची होती

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशविदेशातील पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या नीरज चोप्रा या खेळाडूच्या भाल्यासाठी सर्वाधिक १ कोटी ५० हजार रुपयांची बोली लावण्यात आली आहे. पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंपैकी ऐतिहासिक व धार्मिक महत्वाच्या वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा जास्त कल आहे. तसेच ऑलिम्पिक खेळा़डूंच्या वस्तूंनाही चांगली मागणी आहे.

पॅरालिम्पिकमध्ये भारताचा सुवर्णपदक विजेता खेळाडू सुमित अंतील याने वापरलेल्या भाल्याची लिलावात मूळ बोली १ कोटी रुपयांची होती. आता या रकमेत वाढ होऊन ती १ कोटी २० हजार रुपये झाली आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावात बोली लावण्याची मुदत गुरुवारी संध्याकाळी संपली. या लिलावाला १७ सप्टेंबर रोजी सुरुवात झाली होती. या लिलावातून मिळणारा निधी नमामी गंगे प्रकल्पाला देण्यात येईल.

पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंशी संबंधित वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे. टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा याने ज्या भाल्याच्या साहाय्याने सुवर्णपदक जिंकले, त्या भाल्यावर त्याने आपली स्वाक्षरी केली व तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिला होता. नीरज चोप्राच्या भाल्याला १० कोटी रुपयांची बोली ४ ऑक्टोबर रोजी लावण्यात आली होती. मात्र ही बोली बनावट असल्याचा संशय आल्याने ती रद्द करण्यात आली.

टोकियोमधील पॅरालिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता खेळाडून कृष्ण नागर याने वापरलेल्या बॅडमिंटन रॅकेटला ८०.१५ लाख रुपयांची बोली मिळाली आहे. मात्र हे रॅकेट खरेदी करण्यास फक्त तीन जणांनीच रस दाखविला आहे. राम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांची एकत्रित मूर्ती पंतप्रधान मोदींना भेट मिळाली होती. धातूची ही मूर्ती विकत घेण्यासाठी ४४ जणांनी बोली लावली. त्यातील सर्वाधिक बोली १.३५ लाख रुपयांची आहे. 

राममंदिराच्या प्रतिकृतीसाठी २४ बोलीअयोध्या येथे बांधण्यात येणाऱ्या राममंदिराची लाकडी प्रतिकृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात आली होती. या प्रतिकृतीची मूळ बोली अडीच लाख रुपये ठरविण्यात आली. धार्मिकदृष्ट्या महत्व राखून असलेली ही प्रतिकृती विकत घेण्यासाठी आतापर्यंत २४ बोली लागल्या आहेत. धातूच्या गदेची मूळ बोली अडीच हजार रुपये असली तरी तिच्यासाठी ५४ बोली लागल्या. या गदेची सर्वाधिक बोली आता ५ लाख रुपयांची आहे.

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राNarendra Modiनरेंद्र मोदी