शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा UNGA मध्ये मोठा आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
6
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
7
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
8
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
9
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
10
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
11
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
12
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
13
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
14
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
15
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
16
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
17
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
18
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
20
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका

सायकलचा वाद दिल्लीत !

By admin | Updated: January 3, 2017 04:18 IST

मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव या पिता-पुत्रातील संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच आता सपाचे निवडणूक चिन्ह सायकल स्वत:कडे ठेवण्यासाठी दोन्ही नेत्यांच्या समर्थकांची धावपळ सुरू झाली आहे

हरीश गुप्ता , नवी दिल्लीमुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव या पिता-पुत्रातील संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच आता सपाचे निवडणूक चिन्ह सायकल स्वत:कडे ठेवण्यासाठी दोन्ही नेत्यांच्या समर्थकांची धावपळ सुरू झाली आहे. मुलायमसिंह यादव एव्हाना दिल्लीत दाखल झाले असून, ते निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहेत, तर आयोगाच्या निर्णयाकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे. समाजवादी पक्षाचे नाव, चिन्ह आणि संपत्ती यावरून हा कौटुंबिक संघर्ष आता उफाळला आहे. जर मुलायमसिंह यादव यांनी निवडणूक आयोगाची पायरी चढली, तर अखिलेश यादव यांनी आपली बाजू मांडण्यासाठी रामगोपाल यादव यांना सज्ज ठेवले आहे. दोन्हीही गट आपली बाजू मांडण्यासाठी तयार आहेत.

दरम्यान, सपाच्या घटनेत कोणत्याही परिस्थितीत अध्यक्षांना हटविण्याची कोणतीही तरतूद नाही, तर फक्त अध्यक्षच पक्षाचे अधिवेशन बोलावू शकतात, त्यामुळे बंडखोर गटाकडून मुलायमसिंह यांच्याविरुद्ध घेतला गेलेला कोणताही प्रस्ताव बेकायदेशीर ठरतो. या दाव्या-प्रतिदाव्यांकडे निवडणूक आयोग कशाप्रकारे बघतो हे कोणीही सांगू शकत नाही. एक बाब मात्र नक्की आहे की, ४०३ सदस्यांच्या विधानसभेत अखिलेश यांच्याकडे २२९ सदस्यांचा मोठा पाठिंबा आहे. काँग्रेसचे २८, राष्ट्रीय लोकदल ८, एनसीपी १ आणि एआयटीसी १, तसेच अपक्षांचाही अखिलेश यांनाच पाठिंबा आहे. त्यामुळे अखिलेश यांना सभागृहात तसा कोणताच धोका नाही, तर अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशात महाआघाडीचे नेते म्हणून उदयाला येऊ शकतात.तोडगा न निघाल्यास चिन्ह गोठवणारउत्तर प्रदेशातील निवडणुका एकीकडे तोंडावर आलेल्या असताना सपाच्या निवडणूक चिन्हाचा वाद सोडविणे तसे अवघड काम आहे. जर निवडणूक आयोगाकडे काही तोडगा नसेल तर सध्याचे निवडणूक चिन्ह गोठविले जाऊ शकते, तर दोन्ही गटांना पर्यायी चिन्ह दिले जाऊ शकते, असे कश्यप यांनी सांगितले. सायकल निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे अधिकृत नाव यासाठी अखिलेश यादव यांना संघर्ष करावा लागणार आहे. माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी आणि लोकसभेचे माजी महासचिव सुभाष कश्यप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, यावर तात्काळ निर्णय घेणे निवडणूक आयोगासाठी कठीण आहे.मुलायमसिंह यादव यांनी पक्ष आणि चिन्हावरील आपली पकड कायम ठेवली तर अखिलेश यादव हे पर्यायी चिन्ह निवडू शकतात. मुलायमसिंह यांचा असा युक्तिवाद असू शकतो की, ते समाजवादी पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे सायकल या चिन्हावर त्यांचाच हक्क आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, अखिलेश यादव यांनी समाजवादी जनता पार्टीच्या कमल मोरारका आणि गोपी मनचंदा यांच्याशी चर्चा केली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीसाठी त्यांचे ‘नांगरधारी शेतकरी’ हे चिन्ह मिळविण्याचा हा प्रयत्न आहे. जनता दलाचे (एस) नेते देवेगौडा आणि इतर समाजवादी गट अखिलेश यादव यांचे समर्थन करतील, असा अंदाज आहे. जर असे झाले तर भाजपसाठी ही डोकेदुखी ठरू शकते, कारण अखिलेश यादव यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा कोणताही वैयक्तिक आरोप नाही.