शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

भुपेश बघेल यांच्याकडे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 15:13 IST

भुपेश बघेल हे छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार आहेत. 

नवी दिल्ली - छत्तीगडच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार? याबाबतचा सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. भुपेश बघेल यांच्याकडे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत काँग्रेसकडून बघेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. रविवारी (16 डिसेंबर) छत्तीगसडमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भुपेश बघेल यांची छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे.

सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास बघेल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, अशी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत बघेल यांच्याव्यतिरिक्त टीएस सिंहदेव, ताम्रध्वज साहू आणि चरण दास महंत देखील होते. मात्र बघेल यांचे नाव आघाडीवर होते.  दरम्यान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला 68 जागांवर विजय मिळला आहे.

कोण आहेत भुपेश बघेल?भुपेश बघेल हे छत्तीसगडमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.  23 ऑगस्ट 1961साली बघेल यांचा जन्म छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील पाटण तालुक्यात झाला. 1985 पासून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 1993 साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. 

मध्य प्रदेशातील तत्कालिन दिग्विजय सिंह सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्रीदेखील होते. 2000 मध्येही जोगी सरकारमध्येही त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद होते. ओबीसी नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी घटवण्यामध्ये बघेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्याचे म्हटले जाते. 

 

 

दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटवरवरुन छत्तीसगडमधील मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या टी. एस. सिंह देव, ताम्रध्वज साहू, भुपेश बघेल आणि चरणदास महंत या चार दिग्गज नेत्यांसोबत आपला फोटो शनिवारी (15 डिसेंबर ) शेअर केला होता.  राजधानी दिल्लीत शनिवारी राहुल गांधी यांच्यासोबत टी. एस. सिंह देव, ताम्रध्वज साहू, भुपेश बघेल आणि चरणदास महंत यांची बैठक झाली. यावेळी बैठकीला पक्षाचे केंद्रीय पर्यवेक्षक मल्लिकार्जुन खर्गे, छत्तीसगड प्रभारी पुनिया उपस्थित होते. छत्तीसगडमधील मुख्यमंत्री पदासाठी टी. एस. सिंह देव, ताम्रध्वज साहू, भुपेश बघेल आणि चरणदास महंत यांची नावे सध्या जोरदार चर्चेत होती.

 

टॅग्स :Chhattisgarh Assembly Election Resultछत्तीसगड विधानसभा निवडणूक निकालcongressकाँग्रेसChhattisgarhछत्तीसगड