शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

अयोध्येत ५०० कोटी रुपयांच्या कामांचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 04:52 IST

जय्यत तयारी : भिंती रंगल्या, रस्त्याच्या दुतर्फा भगवान रामाचे होर्डिंग्ज

त्रियुग नारायण तिवारी ।लोकमत न्यूज नेटवर्कअयोध्या : राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून जवळपास ५०० कोटी रुपये खर्चाच्या योजनांचे भूमीपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

अयोध्येत जी कामे होणार आहेत त्यात पिण्याच्या पाण्याची योजना असून यासाठी ५४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तुलसी भवनाच्या आधुनिकीकरणासाठी १८ कोटी, राम कथा पार्कच्या विस्तारीकरणासाठी पावणेतीन कोटी, अयोध्या ते बसखारी या ३७ किमीच्या चार पदरी मार्गासाठी २५२ कोटी तसेच राजर्षी दशरथ मेडिकल कॉलेजचा लेक्चरर हॉल, प्रशासकीय भवन, ग्रंथालय, वसतिगृह यांचे लोकार्पण यांचा समावेशआहे. लक्ष्मण किल्लाघाटाचे लोकार्पण (१० कोटी), अयोध्या चार पदरी रस्त्यानजीक नव्या बसस्थानकास ८ कोटी, विभागीय आरोग्य केंद्राचे लोकार्पण आणि अन्य काही कामांचे भूमीपूजन होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या ५ आॅगस्टच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे. अयोध्येचे डीआयजी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक दीपक कुमार यांनी अयोध्येचा दौरा करुन सुरक्षेची पाहणी केली.

ते ‘रामभक्त’ही निघालेआता न्यायालयाच्या आदेशानेच भव्य राममंदिर उभे राहणार असल्याने मुस्लिमांमधील बऱ्याच लोकांनाही आनंद झाला असून, या भव्य मंदिराच्या ऐतिहासिक भूमिपूजनासाठी अनेक मुस्लिम ‘रामभक्त’ अयोध्येकडे रवाना होत आहेत. छत्तीसगढमध्ये राहणारे फैज खान यांनी, मंदिर उभारणीत आपलाही खारीचा वाटा असावा या भावनेने, त्यांच्या मूळ गावाहून मंदिरासाठी विटा सोबत घेऊन अयोध्येत येऊन दाखल झाले आहेत. मुस्लिम राष्ट्रीय मंचचे अवध प्रांतप्रमुख डॉ. अनिल सिंग यांनी फैज खान विटा घेऊन आले आहेत, यास दुजोरा दिला.२००० फूट खोलवर टाईम कॅप्सूलभविष्यात मंदिराशी संबंधित मुद्यांवर वाद होऊ नयेत म्हणून या परिसरात २००० फूट खोलवर टाइम कॅप्सुल ठेवण्यात येईल. या कॅप्सुलमध्ये मंदिराचा इतिहास, याबाबतची माहिती असेल.राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी सांगितले की, भविष्यात जर कुणाला राम मंदिराच्या इतिहासाचे अध्ययन करायचे असेल तर त्यांना राम जन्मभूमीशी संबंंधित माहिती मिळून जाईल आणि नवा वाद निर्माण होणार नाही. ही कॅप्सुल एका ताम्रपत्रात ठेवली जाईल.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर