शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगाव दंगल; मिलिंद एकबोटेला अद्याप अटक का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 02:48 IST

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात दिरंगाई होत आहे, असा ठपका सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्षपणे राज्य सरकारवर ठेवला.

नवी दिल्ली : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात दिरंगाई होत आहे, असा ठपका सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्षपणे राज्य सरकारवर ठेवला. दंगल घडविण्याचा आरोप असलेल्या मिलिंद एकबोटेला अद्याप अटक का केली नाही, असा जाब न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी विचारला.राज्य सरकारने त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 'एकबोटे आम्हाला सापडलाच नाही,' असा बचाव सरकारी वकिलांनी केली. त्यावर 'आम्ही पोलिसांकडे जायला तयार आहोत. सहकार्यही करू, तेच (पोलीस) आम्हाला बोलावत नाहीत,' असे स्पष्टीकरण एकबोटेच्या वकिलांनी दिले.भीमा कोरेगावमध्ये १ जानेवारी रोजी शौर्यस्तंभ वंदन कार्यक्रमास गालबोट लागले होते. शौर्यस्तंभास वंदन करण्यासाठी राज्यातून आलेल्या लोकांवर जमावाने दगफेक केली. २ हजारांच्या जमावाने जमलेल्या लोकांवर अचानक हल्ला केला होता. मोठी दंगल त्यानंतर उसळली होती. एका युवकाचा मृत्यू २ गटांमधील संघर्षात झाल्याने त्यात अजूनच ठिगणी पडली. राज्यभर त्याची प्रतिक्रिया उमटली होती.संभाजी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांनीच हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. एकबोटेचा शोध तेव्हापासूनच सुरू आहे. दंगलीच्या दिवशी आपण तिथे नव्हतो, असे स्पष्टीकरण एकबोटेने दिले होते. अटकपूर्व जामिनासाठी एकबोटेची सत्र ते उच्च न्यायालयापासून धावाधाव सुरू आहे. उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना एकबोटेचा थांगपत्ता लागला नाही. सर्वोच्च न्यायालयासमोर मात्र एकबोटे 'मला बोलावत नसल्याची' बतावणी करीत आहे. सरकारने त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. पुढील सुनावणी १४ मार्चला होईल.- अ‍ॅड. निशिकांत कातनेश्वरकर (राज्य सरकारचे वकील).

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMilind Ekboteमिलिंद एकबोटे