संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आज लोकसभेत प्रचंड गदारोळात पार पडला. तथापि, राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी काही प्रमाणावर कामकाज पार पाडले. दरम्यान, राज्यसभेत पहिल्या दिवशी भाजपचे खासदार भीम सिंह यांनी, प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्यवीर सावरकर, प्रसिद्ध समाजसुधारक स्वामी सहजानंद सरस्वती आणि फील्ड मार्शल सॅम मानेक शॉ यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. या तिन्ही महान व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात देशाला एक नवी दिशा दिली आहे. असेही ते म्हणाले.
एएनआय सोबत बोलताना भीम सिंह म्हणाले, "वीर सावरकर एक अशी विभूती आहे. ज्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा सुनावण्यात आल्या होत्या." ते पुढे म्हणाले, सावरकर हे केवळ एक क्रांतिकारकच नव्हे तर एक विचारकवंत, लेखक आणि दृष्टे व्यक्तीही होते. ज्यांच्यापासून भगत सिंगांसारखे क्रांतिकारकही प्रभावित झाले. दुसऱ्या बाजूला स्वामी सहजानंद सरस्वती. एक असे संन्यासी होते, ज्यांना हिमालयाच्या गुहांमध्ये नव्हे, तर गावातील शेतांमध्ये, शेतकऱ्यांच्या अश्रूंमध्ये आणि शोषितांच्या वेदनांमध्ये इश्वर बघितला. त्यांनी शेतकऱ्यांना संघटित केले आणि जमीनदारी उन्मूलन चळवळीला दिशा दिली आणि जय किसान या नाऱ्याला पुढे नेत एक ध्येय बनवले."
बांगलादेश युद्धादरम्यान भारतीय सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या फील्ड मार्शल मानेक शॉ यांचा उल्लेख करत भीम सिंह यांनी त्यांनाही भारतरत्न देण्याची मागणी केली. ते म्हणाले, "भारताचे सुपुत्र मानेक शॉ यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९७१ मध्ये निर्णायक युद्धात पाकिस्तानचा पराभव केला. इतकेच नाही तर त्यांनी बांगलादेशच्या नेतृत्वातही आपली भूमिका बजावली. फील्ड मार्शल शॉ यांच्या नेतृत्वाने, दूरदृष्नेटी आणि सामरिक कौशल्याने भारताचे नाव लष्करी इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले."
सिंह म्हणाले, या तीनही महान सुपुत्रांचे योगदान बघता, आज भारताने या महान सुपुत्रांचा सन्मान करायला हवा आणि त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करायला हवे.