शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निकालाचा परिणाम की...? भाजपनं अनेक राज्यांत नियुक्त केले नवे प्रभारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 18:47 IST

भारतीय जनता पक्षाने देशातील अनेक राज्यांमध्ये नव्या प्रभारी आणि सहप्रभारींची नेमनूक केली आहे. संघटनेच्या या नव्या प्रभारी आणि सहप्रभारींच्या ...

भारतीय जनता पक्षाने देशातील अनेक राज्यांमध्ये नव्या प्रभारी आणि सहप्रभारींची नेमनूक केली आहे. संघटनेच्या या नव्या प्रभारी आणि सहप्रभारींच्या नावांची यादीही शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर तसेच आगामी काही राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे.

भाजपच्या यादीत 23 राज्ये -भाजपने जाहीर केलेल्या या यादीत 23 राज्ये आणि इशान्येकडील प्रदेश प्रभारी तथा सह प्रभारी नियुक्तीची माहिती दिली आहे. यानुसार, आमदार अशोक सिंघल यांना अरुणाचल प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. श्रीकांत शर्मा यांना हिमाचल प्रदेशचे प्रभारी म्हमून नियुक्त करण्यात आले आहे. तर संजय टंडन सह प्रभारी असतील. जम्मू-काश्मीरच्या प्रभारीपदाची धुरा तरुण चुघ यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. कर्नाटकचे प्रभारी म्हणून राधा मोहन दास अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याच वर्षात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये निवडणुका -याच वर्षात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपच्या या यादीत महाराष्ट्राच्या प्रभारी अथवा सहप्रभारींचे नाव नाही. झारखंडमध्ये आधीच तैनात असलेले लक्ष्मीकांत वाजपेयी हेच पुढेही काम बघतील. तर, राजधानी दिल्लीला लागून असलेल्या हरियाणामध्ये राजस्थानचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांना प्रभारी म्हणून आणि सुरेंद्र सिंह नागर यांना सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

बदलाची सुरुवात...?भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्तीचे पत्र जारी केले आहे. काही राज्यांमध्ये केवळ प्रभारी तर काही राज्यांमध्ये सहप्रभारीही नियुक्त करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणूक झाल्यापासूनच भाजप मोठ्या प्रमाणावर बदल करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. आता राज्यांमधील प्रभारी आणि सह प्रभारींच्या नियुक्तीने याची सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक 2024J P Naddaजगत प्रकाश नड्डाNarendra Modiनरेंद्र मोदी