शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या भूमिपुत्राला ‘भारतरत्न’ सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 04:34 IST

‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान मिळालेले चंडिकादास अमृतराव देशमुख उपाख्य नानाजी देशमुख यांचे महाराष्ट्राच्या मातीशी खूप जुने ऋणानुबंध होते.

- नंदकिशोर पाटील ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान मिळालेले चंडिकादास अमृतराव देशमुख उपाख्य नानाजी देशमुख यांचे महाराष्ट्राच्या मातीशी खूप जुने ऋणानुबंध होते. नानाजींची कर्मभूमी राजस्थान आणि उत्तर प्रदेश असली तरी त्यांची जन्मभूमी महाराष्ट्र आहे, हे अनेकांना माहिती नसेल. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील कडोली या छोट्याशा गावी नानांजींचा (११ ऑक्टोबर १९१६) जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यात लहानपणीच मातृपितृ छत्र हरपलेले. भाजी विकून आणि मंदिरात राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी त्यांची बिर्ला इंस्टीट्यूट या नामांकित संस्थेत निवड झाली आणि त्यांचे जीवनच बदलून गेले.स्वालंबन, स्वयंशिस्त आणि संस्कार हे त्रिगुण अंगी असलेले नानाजी उच्च शिक्षण पूर्ण करताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात सामील झाले. नानाजींची मेहनत, राष्ट्रीय विचार आणि समाजसेवेची आवड बघून सरसंघचालक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी त्यांच्यावर प्रान्त प्रचारक म्हणून उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपविली. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रवादी विचारांनी पे्ररित झालेल्या नानाजींनी सामाजिक कार्याचा यज्ञच सुरू केला. १९४० मध्ये डॉ. हेडगेवार यांच्या निधनानंतर नानाजींवर महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली. नानाजींनी संघ कार्यात स्वत:ला झोकूनच दिले असे नाही, तर आपले संपूर्ण जीवन संघकार्याला वाहून घेतले. विनोबाजींच्या भूदान चळवळीतही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, त्यांचा ओढा संघकार्याकडे अधिक असल्याने ते संघातच रमले.उत्तरप्रदेशात नानाजींनी शिक्षण कार्यावर विशेष भर दिला. त्यांच्याच प्रयत्नाने गोरखपूर येथे सरस्वती शिशु मंदिर सुरू झाले. रा. स्व. संघाने १९४७ मध्ये सुरू केलेल्या ‘राष्ट्रधर्म’ आणि पांचजन्य’ या दोन साप्ताहिकाच्या संपादनाची जबाबदारी अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर होती, मात्र या नियतकालिकांची आर्थिक बाजू नानजींनी सांभाळली. १९४८ साली महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर बंदी आली. त्यामुळे भूमिगत राहून नानाजींनी कापले कार्य चालू ठेवले.