शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेदरम्यान चिमुकलीला घातली सँडल; राहुल गांधींनी जिंकलं सर्वांचं मन, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 17:52 IST

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रे दरम्यान एका कार्यकर्त्यांसोबत एक लहान मुलगी राहुल गांधींच्या सोबत चालत होती. अचानक राहुल गांधींची नजर तिच्या पायाकडे गेली. त्या मुलीच्या पायातील सँडल निघाली होती.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा, सध्या केरळमध्ये दाखल झाली आहे. पक्षाचे शेकडो कार्यकर्ते व नेते या यात्रेत सहभागी झाले आहेत. राजकारणातील जाणकारांच्या मते या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसला पुन्हा रुळावर आणता येईल. त्यामुळे ती यशस्वी करण्यासाठी काँग्रेसकडून प्रत्येक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याच यात्रेदरम्यान राहुल गांधींचा (Rahul Gandhi) एक फोटो आणि व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. राहुल गांधींच्या एका कृतीने सर्वांचच मन जिंकल्याचं पाहायला मिळत आहे. 

भारत जोडो यात्रे दरम्यान एका कार्यकर्त्यांसोबत एक लहान मुलगी राहुल गांधींच्या सोबत चालत होती. अचानक राहुल गांधींची नजर तिच्या पायाकडे गेली. त्या मुलीच्या पायातील सँडल निघाली होती. राहुल गांधींनी त्या मुलीसोबत असणाऱ्या व्यक्तीला थांबवत सँडल निघाल्याचं सांगितलं. मात्र नंतर स्वत: चं खाली वाकून त्या मुलीला सँडल घालण्यात मदत केली आहे. काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे फोटो शेअर केले आहेत. सध्या या फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे. 

काँग्रेसने "भारत जोडो यात्रा में दिखा एक खूबसूरत लम्हा... हम कदम से कदम मिला रहे हैं, हर मुश्किल को आसान कर, सभी को साथ लेकर आगे बढ़ रहे हैं, क्योंकि हम सभी को अपना मानते हैं, उनका ख़्याल रखना जानते हैं" असं म्हणत राहुल गांधींच्या फोटो शेअर केला आहे. राजस्थान (Rajasthan) आणि दिल्लीतील (Delhi) काँग्रेस कार्यकारीणीनंतर आज छत्तीसगड (Chhattisgarh)  काँग्रेसनेहीराहुल गांधींना (Rahul Gandhi) पक्षाध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर केला आहे. काल हा ठराव जयपूर आणि दिल्लीतही मंजूर झाला. राहुल गांधींचे मन वळवण्याच्या काँग्रेस नेत्यांकडून प्रयत्न होत आहे. याचाच भाग म्हणून विविध राज्यात ठराव मंजूर केले जात आहेत.

राहुल गांधींना पक्षाध्यक्ष करण्याची मागणी

छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कमिटीने काँग्रेसच्या भावी अध्यक्षांना प्रदेशाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि इतर एआयसीसी (All India Cngress Comitee)  प्रतिनिधी नियुक्त करण्याचे अधिकारही दिले आहेत. पक्षाचे राज्य मुख्यालय 'राजीव भवन' येथे झालेल्या बैठकीत हे दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. बैठकीनंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) म्हणाले की, त्यांनी राहुल गांधींना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस