शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत जोडो यात्रा’ मध्य प्रदेशात दाखल; कडाक्याच्या थंडीत आदिवासींनी रात्र जागून काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 12:38 IST

   नानासाहेब कांडलकर   जळगाव जामोद (जि. बुलढाणा) : काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ बुधवारी ...

  

नानासाहेब कांडलकर  

जळगाव जामोद (जि. बुलढाणा) : काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ बुधवारी मध्य प्रदेशात दाखल झाली. यावेळी राहुल गांधींच्या भेटीसाठी सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या भिंगारा, चाळीसटापरी व गोमाल या गावांतील आदिवासी बांधव, महिला व मुलांनी महाराष्ट्र व मध्यप्रदेशची सीमा असलेल्या तीनखुटी येथे कडाक्याच्या थंडीत संपूर्ण रात्र जागून काढली. बुधवारी सकाळी ६:३० वाजता राहुल गांधी तेथे पोहोचले, त्यावेळी सर्व आदिवासी बांधवांनी ‘भारत जोडो’चा जयजयकार करीत ‘हम भी आप के साथ है’ असा संदेश दिला.

राहुल गांधी यांनी अत्यंत नम्रपणे आदिवासी बांधवांनी दिलेला धनुष्यबाण स्वीकारत त्यांच्यासोबत संवाद साधला. आदिवासींना सन्मानाचे जीवन कसे जगता येईल यासाठी आपण प्रयत्नरत राहू, असा विश्वास राहुल गांधी यांनी आदिवासींना दिला. 

‘झुकना बंद करो’  तीनखुटी येथे आदिवासी बांधवांशी संवाद  साधताना दोन छोटी मुले राहुल गांधी यांच्या पाया पडत होती. त्यांना मायेने थांबवत ‘झुकना बंद करो, मेरे पैर पडने की कोई जरूरत नहीं, सन्मान से जिओ’ असा संदेश राहुल गांधी यांनी दिला.

बोदरली येथे ध्वज हस्तांतरण   सातपुडा पर्वतातील आमपाणी येथे ध्वजाराेहणानंतर ही यात्रा रवाना झाली. आमपाणी ते मध्य प्रदेशातील बोदरलीपर्यंत सुरक्षेच्या कारणावरून ही यात्रा  वाहनाने गेली. बोदरलीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोलेंनी मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना तिरंगा ध्वज हस्तांतरित केला . 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस