शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी आज कोर्टात हजर राहणार, न्याय यात्रेला ब्रेक लागणार, नेमकं प्रकरण काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 09:03 IST

Bharat Jodo Nyaya Yatra: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशमध्ये पोहोचली आहे. मात्र आज या यात्रेला काही तासांसाठी ब्रेक लागणार आहे. त्याचं कारण म्हणजे राहुल गांधी हे २०१८ मधील एका प्रकरणात सुल्तानपूरमधील एका स्थानिक कोर्टामध्ये हजर राहणार आहेत.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशमध्ये पोहोचली आहे. मात्र आज या यात्रेला काही तासांसाठी ब्रेक लागणार आहे. त्याचं कारण म्हणजे राहुल गांधी हे २०१८ मधील एका प्रकरणात सुल्तानपूरमधील एका स्थानिक कोर्टामध्ये हजर राहणार आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी भारत जोडो न्याय यात्रा काही काळासाठी थांबणार आहे. कारण राहुल गांधी हे मानहानीच्या एका प्रकरणामध्ये सुल्तानपूरच्या एका स्थानि कोर्टात हजर राहणार आहेत. याबाबत सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये जयराम रमेश यांनी लिहिले की, भारत जोडो न्याय यात्रेला सोमवारी ३७ दिवस झाले आहेत, मात्र ही यात्रा मंगळवारी सकाळी थोड्या काळासाठी थांबणार आहे.  दुपारी दोन वाजता अमेठी येथील फुरसतगंज येथून पुन्हा सुरू होईल. राहुल गांधी मंगळवारी सकाळी ११ वाजता सुलतानपूरच्या स्थानिक कोर्टात हजर राहण्याची शक्यता आहे.

२०१८ मधील एका प्रकरणात राहुल गांधी यांना सुलतानपूरच्या एका कोर्टाने समन्स बजावलं आहे. २०१८ मध्ये राहुल गांधी यांनी बंगळुरूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत एक आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्याविरोधात भाजपाचे नेते विजय मिश्रा यांनी तक्रार दिली होती. विजय मिश्रा यांचे वकील संतोष कुमारप पांडे यांनी सांगितले की, जर राहुल गांधी या प्रकरणात पुरावे मिळून दोषी ठरले तर त्यांना दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते.  

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस