शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अखिलेश यादव भारत जोडो न्याय यात्रेत कधी सहभागी होणार?; जयराम रमेश म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 10:38 IST

यात्रेला उत्तर प्रदेशात दाखल होऊन तीन दिवस झाले असले तरी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव अद्याप यामध्ये सहभागी झालेले नाहीत. याबाबत जयराम रमेश यांना विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं आहे. 

भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशमध्ये पोहोचली आहे. आज ही यात्रा वाराणसी आणि प्रयागराज मार्गे प्रतापगडला पोहोचली आहे, जी आजच राहुल गांधींचा माजी संसदीय मतदारसंघ असलेल्या अमेठीमध्ये पोहोचेल. यात्रेला उत्तर प्रदेशात दाखल होऊन तीन दिवस झाले असले तरी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव अद्याप यामध्ये सहभागी झालेले नाहीत. याबाबत आता जयराम रमेश यांना विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं आहे. 

काँग्रेसच्या जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, "उद्या अखिलेश यादव भारत जोडो यात्रेत सहभागी होतील अशी आशा आहे. अपना दल (कमेरवादी) नेत्या पल्लवी पटेलही आमच्या यात्रेत सहभागी झाल्या होत्या."

जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की, "भारत जोडो न्याय यात्रेचा आज 37 वा दिवस आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी आज बाबूगंजमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. आम्ही आज रात्री अमेठीत राहू आणि सकाळी रायबरेलीला जाणार आहोत. त्यानंतर उद्या लखनौमध्ये राहू. आम्ही दुसऱ्या दिवशी कानपूरमध्ये थांबू. त्यानंतर 22 आणि 23 फेब्रुवारीला विश्रांती घेऊ."

राहुल गांधींसोबत प्रियंका गांधीही आज अमेठीमध्ये दिसणार आहेत. यापूर्वी 16 फेब्रुवारी रोजी त्यांनी सांगितलं होतं की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. मला बरं वाटल्यावर मी या यात्रेत सहभागी होईन. तोपर्यंत चंदौली-बनारसला पोहोचणाऱ्या सर्व लोकांनी पूर्ण मेहनत घेऊन यात्रेची तयारी सुरू ठेवावी. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस