शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Bharat Gold Mines: बंद होणार देशातील सर्वात मोठी 'भारत गोल्ड माइन्स', याच ठिकाणी झाली KGF-2ची शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 19:12 IST

Bharat Gold Mines: केंद्र सरकारने भारत गोल्ड मायनिंग लिमिटेडला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याला कोलार गोल्ड फील्ड नावानेही ओळखले जाते.

Bharat Gold Mines: केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत गोल्ड मायनिंग लिमिटेड (BGML) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. भारत गोल्ड माईन्स लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून, एप्रिल 1972 मध्ये खाण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली याला समाविष्ट केले गेले होते. ही खाण कोलार गोल्ड फील्ड (KGF) म्हणूनही ओळखला जातो. या KGFच्या पार्श्वभूमीवर बनवलेल्या KGF या चित्रपटाने देश-विदेशात चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. 1900 च्या पहिल्या दशकात येथे सोन्याचे उत्पादन झाल्याचे सांगितले जाते. त्यावेळी भारतातील 95 टक्के सोन्याचे उत्पादन केजीएफमधून होत असे. 

2006 मध्ये केंद्र सरकारने जागतिक निविदेद्वारे मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला होता. परंतु वेळ निघून गेल्याने, विविध बदल आणि समस्यांमुळे मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. मात्र, कंपनी बंद झाल्यानंतर तिचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी होत आहे. अनेक राज्ये आणि केंद्रीय मंत्रीही कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी आग्रही आहेत. मात्र, यासाठी कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्राने 2021 मध्ये स्पष्ट केले आहे.

2001 पासून कामकाज बंद केलेकोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्रीय कोळसा आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "भारत गोल्ड माइन्स लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम एप्रिल, 1972 मध्ये पूर्वीच्या खाण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली KGF येथे कार्यालयासह समाविष्ट करण्यात आला होता. यात प्रामुख्याने सोन्याचे खाणकाम करण्यासाठी KGF आणि आंध्र प्रदेशातील काही ठिकाणी काम व्हायचे. त्याचे ऑपरेशन आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य बनल्यामुळे, 12 जून 2000 रोजी ते बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले. 1 मार्च 2001 पासून बीजीएमएलचे कामकाज बंद करण्यात आले. 

टॅग्स :kgf 2केजीएफGoldसोनंCentral Governmentकेंद्र सरकार