शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आई विनवण्या करत असतानाही आंदोलकांनी रुग्णवाहिका अडवली, बाळाने कुशीतच सोडले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 11:34 IST

एके ठिकाणी बाळाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला आंदोलकांनी घेरले.

नवी दिल्ली: दलित अत्याचारविरोधी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात सोमवारी अनेक दलित संघटना सोमवारी रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. याचा सर्वाधिक फटका बिहार आणि उत्तर प्रदेश या भागात बसला. अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरलेला जमाव हिंसक झाला होता. यामुळे एका नवजात बालकाचा उपचारांअभावी मृत्यू झाला. जन्माला आल्यानंतर या अर्भकाची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारांसाठी हाजीपूर येथील रुग्णालयात नेले जात होते.मात्र, यावेळी रस्त्यावर आंदोलकांकडून जाळपोळ सुरू होती. या आंदोलकांनी रस्त्यावर टायर्स आणि इतर वस्तू टाकून रस्त्यावर अडथळे निर्माण केले होते. एके ठिकाणी बाळाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला आंदोलकांनी घेरले. यापैकी काही आंदोलकांनी रुग्णवाहिकेवर काठ्यांनी हल्लाही चढवला. यावेळी बाळाची आईने आंदोलनकर्त्यांना आम्हाला रुग्णालयात जाऊन द्या, अशी विनवणीही केली. मात्र, कोणीही तिचे म्हणणे ऐकून घेतले नाही. या आंदोलकर्त्यांनी रुग्णवाहिकेचा रस्ता तसाच रोखून धरला. त्यामुळे उपचारांअभावी नवजात अर्भकाने आईच्या कुशीतच आपला प्राण सोडला. या घटनेनंतर आईच्या चेहऱ्यावर एकीकडे बाळ गमावल्याची यातना  दिसत होती तर दुसरीकडे आंदोलकांबद्दल मनात प्रचंड चीडही होती. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भारत बंद आंदोलनाच्यावेळी झालेल्या हिंसाचारात ९ जण ठार झाले. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि पंजाबनंतर महाराष्ट्रातही काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी सरकार सहमत नाही. या निर्णयाचा व्यापक आढावा घेण्यासाठी सरकारने याचिका दाखल केलेली आहे.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा