शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

Bhagwant Mann : भगवंत मान यांच्यावर रोड शोदरम्यान दगडफेक; डोक्याला दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 19:42 IST

Punjab Election 2022 : रुग्णालयात उपचार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रचार सुरू केला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच  आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्यावर रोड शो दरम्यान हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अमृतसर येथील अटारी भागातून भगवंत मान यांचा ताफा जात असतानाच लोक स्वागत करण्यासाठी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत होते. त्यावेळी अज्ञाताकडून त्यांच्यावर दगड भिरकावण्यात आला. यात ते जखमी झाले आहेत.

भगवंत मान हे शुक्रवारी अमृतसर जिल्ह्यातील आपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. दुपारी अमृतसर-अटारी मार्गावर त्यांचा रोड शो होता. या रोड शो साठी मोठी गर्दी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फाही मोठ्या संख्येने समर्थक उभे होते. कारचा सनरूफ उघडून भगवंत मान हे उभे राहिले होते व लोकांना अभिवादन करत ते पुढे चालले होते. लोक स्वागत करण्यासाठी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत होते. त्याचवेळी गर्दीतून अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर दगड फेकण्यात आला. त्यात ते जखमी झाले. या घटनेनंतर उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रचार सुरू केला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, पंजाबमधील सर्व जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर निकाल 10 मार्चला लागणार आहेत. आम आदमी पार्टीकडून भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पंजाब विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. आम आदमी पार्टीने लोकांची मते मागवून त्यानुसार हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. दरम्यान, भगवंत मान हे पंजाबमधील संगरूर येथून दोनवेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. 

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२AAPआपPunjabपंजाब