शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Bhaiyyuji maharaj suicide: भय्युजी महाराजांची इंग्रजीत लिहिलेली सुसाईड नोट सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 16:07 IST

भय्युजी महाराजांनी आत्महत्या केली तेव्हा त्यांची आई व पत्नी घरातच होत्या.

मुंबई: प्रसिद्ध धर्मगुरू भय्युजी महाराज यांनी मंगळवारी इंदूर येथील निवासस्थानी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या बातमीने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काही वेळापूर्वीच त्यांच्या खोलीत आत्महत्येपूर्वी लिहलेली चिठ्ठी सापडली. इंग्रजी भाषेत लिहलेल्या या एकपानी पत्रात भय्युजी महाराजांनी आपल्या मृत्यूचे कारण सांगितले आहे. आयुष्यातील ताणतणावांना मी कंटाळलो आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये, असे भय्युजी  महाराजांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. भय्युजी महाराजांनी हे पत्र लिहल्यानंतर लगेचच स्वत:वर गोळी झाडून घेतल्याचे समजते. भय्युजी महाराजांनी आत्महत्या केली तेव्हा त्यांची आई व पत्नी घरातच होत्या. त्यांचे काही अनुयायीही घरात हजर होते. गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आल्यानंतर सर्वजण त्यांच्या खोलीच्या दिशेने धावले. त्यावेळी खोलीचे दार आतून बंद होते. भय्युजी महाराजांच्या अनुयायांनी हे दार तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी भय्युजी महाराज रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.  

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराजSuicideआत्महत्याDeathमृत्यू