शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

भागवतांना स्वयंसेवकांवर इतकाच विश्वास असेल स्वत:च्या सुरक्षा ताफ्यात कमांडो कशाला?- मायावती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 10:49 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय लष्करापेक्षा जलदगतीने सैन्य उभारणी करू शकतो.

लखनऊ: सरसंघचालक मोहन भागवत यांना आपल्या स्वयंसेवकांवर इतकाच विश्वास असेल, तर त्यांनी सरकारकडून देण्यात आलेली कमांडो सुरक्षा कशासाठी ठेवली आहे, असा सवाल 'बसपा'च्या सर्वेसर्वा मायावती यांनी विचारला. मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय लष्करापेक्षा जलदगतीने सैन्य उभारणी करू शकतो, अशा आशयाचे विधान केले होते. भागवत यांच्या या विधानावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर मायावती यांनी भागवत यांना लक्ष्य केले. भारतीय लष्कराला सध्या विविध प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. भागवतांचे वक्तव्य हे जवानांचे मानसिक खच्चीकरण करण्यासारखे आहे. मोहन भागवत यांना आपल्या स्वंयसेवकांवर इतका विश्वास असेल तर सरकारी खर्चाने त्यांनी विशेष कमांडो आपल्या सुरक्षेसाठी का ठेवले आहेत, असा सवाल मायावतींनी विचारला. तसेच RSS ही आता सामाजिक संघटना राहिली नसून ती राजकीय झाली आहे. सामाजिक सेवेचा बुरखा पांघरून RSS भाजपाला निवडणुकीत मदत करत असल्याचा आरोपही मायावती यांनी केला. 

नेमके मोहन भागवत काय म्हणालेत?भारतीय लष्कराला सैन्य उभारणीसाठी अनेक महिने लागतात. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेळ आल्यास अवघ्या तीन दिवसांमध्ये स्वत:चे लष्कर उभे करू शकते, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. मोहन भागवत सध्या दहा दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. त्यांनी रविवारी (11 फेब्रुवारी) मुजफ्फरनगर येथे संघाच्या बिहार व झारखंडमधील कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी भागवत म्हणाले की, ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही काही लष्करी संघटना नाही. देशाला गरज पडल्यास आणि देशाच्या संविधानाने.... (भाषण करताना पॉझ घेतला) तर भारतीय लष्कराला सैन्य उभारणीसाठी सहा ते सात महिने लागतील. मात्र, आम्ही संघाच्या स्वयंसेवकांना एकत्र करून अवघ्या तीन दिवसात सैन्य उभारून सज्ज होऊ शकतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे ती क्षमता आहे.''देशातील आपत्तीच्यावेळी संघ स्वयंसेवक नेहमीच तत्पर असतात, असं सांगतानाच 'भारत-चीन युद्धाच्यावेळी स्वयंसेवक सीमेवर पाय रोवून उभे राहिले. स्वयंसेवकांनी चीनच्या सैनिकांचा मुकाबला केला. स्वयंसेवकांनी जर मनात आणलं तर आताही चीनच्या सैनिकांना भारतात घुसखोरी करणं कठीण होईल,' असेही यावेळी भागवत यांनी सांगितले होते. 

टॅग्स :mayawatiमायावतीMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ