शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Bhagwant Mann: 'आप'चा मोठा आदेश, पंजाबमधील 184 व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 17:21 IST

आप सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे माजी मंत्री, आमदार आणि व्हीआयपी व्यक्तींना पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षेत 300 कर्मचारी अधिक तैनात असल्याचे समोर आले.

नवी दिल्ली - दिल्लीनंतर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर आपकडून धाडसी निर्णय घेतले जात आहेत. काही दिवसांपूर्वी पंजाबमधील जनतेला 300 युनिट वीज मोफत देण्याच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती. आपच्या दोन आमदारांनी केवळ 1 रुपये मानधनावर काम करणार असल्याचेही जाहीर केले आहे. तर, आमदारांना केवळ 1 टर्मचीच पेन्शन देण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता. त्यानंतर, आता पंजाब सरकारने राज्यातील 184 व्हीआयपी व्यक्तींची सुरक्षा माघारी घेण्याचा आदेश जारी केला आहे. एडीजीपीद्वारे सर्वच पोलीस प्रमुखांना हे आदेश पाठवण्यात आले आहेत. 

आप सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे माजी मंत्री, आमदार आणि व्हीआयपी व्यक्तींना पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षेत 300 कर्मचारी अधिक तैनात असल्याचे समोर आले. आपचे सरकार बनल्यापासून दुसऱ्यांदा सुरक्षा जवानांना वापस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी, ज्यांची सुरक्षा वापस घेण्यात आली आहे. त्यामध्ये, डझनभर पेक्षा अधिक माजी मंत्री आणि माजी खासदारांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत असलेल्या सुरक्षा जवानांनाही वापस घेण्यात आले आहे. 

आम आदमी पार्टीचे माजी प्रदेश कन्वीनर सुच्चा सिंह छोटपुर, माजी खासदार राजीव शुक्ला, माजी खासदार संतोष चौधरी, वरिंदर सिंह बाजवा,  माजी कॅबिनेट मंत्री सुरजीत सिंह रखड़ा, जनमेजा सिंह सेखो, बीबी जगीर कौर, मदन मोहन मित्तल, गुलजार सिंह राणिके, सोहन सिंह ठंडल, तोता सिंह यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्यासंह, अनेक माजी चेअरमन राहिलेल्यांची सुरक्षा कमी केली आहे. दरम्यान, गेल्या मार्च महिन्यात 400 पेक्षा अधिक वेगवेगळ्या बटालियन व कमांडो फोर्सेसच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेत बोलाविण्यात आले होते. जे व्हीआयपींच्या सुरक्षेत तैनात होते. सर्वा जास्त सुरक्षा पंजाबचे माजी मंत्री अमरिंदर सिंह, राजा वाडिंग आणि अर्थमंत्री मनप्रीत सिंह बादल यांच्याकडून परत घेण्यात आली आहे. 

टॅग्स :AAPआपBhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबministerमंत्री