शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Bhagwant Mann: 'आप'ने शब्द पाळला... नांदेडहून प्रवाशी नेणाऱ्या ड्रायव्हरच्या कुटुंबीयांस 50 लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 16:26 IST

पीआरटीसी ड्रायव्हर मंजीत सिंह हे कर्तव्यावर असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता

चंडीगड - पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन होताच पंजाब सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील नागरिकांना 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता, कोविड काळात राज्य परिवहन सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या मंजीत सिंग यांच्या कुटुंबीयांस 50 लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे. मंजीतसिंग हे पंजाब परिवहन सेवेची बस चालवत होते. 26 एप्रिल 2020 रोजी कोविड कालावधीत त्यांचा मृत्यू झाला होता. 

पीआरटीसी ड्रायव्हर मंजीत सिंह हे कर्तव्यावर असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. मंजीत सिंग यांच्या निधनानंतर पंजाबमधील तत्कालीन काँग्रेस सरकारने 10 लाख रुपये मंजीत सिंग यांच्या कुटुंबीयांस देऊ केले. लॉकडाऊन काळात महाराष्ट्राच्या नांदेडमधील हुजूर साहिब येथे अडकलेल्या तिर्थक्षेत्र प्रवाशांना पंजाबमध्ये परत आणण्यासाठी पंजाब परिवहन सेवेच्या विषेश ड्युटीवर ते कार्यरत होते. यावेळी, कोविड कालावधील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपये देण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली होती. त्यावेळी, मंजीत सिंग यांच्या कुटुंबीयांसही 50 लाख मदत निधीची मागणी आपने केली होती.  विधानसभा निवडणूकपूर्व वचननाम्यातही आम आदमी पक्षाने मंजीतसिंग यांच्या कुटुंबीयांस 50 लाख रुपये मदतनिधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे, सरकारमध्ये येताच आपने हे आश्वासन पूर्ण केल्यामुळे नागरिकांकडून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे.  

टॅग्स :NandedनांदेडBhagwant Mannभगवंत मानAAPआपcorona virusकोरोना वायरस बातम्या