शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

सरकारचा अर्थ काय? भगवंत मान यांचा 'हा' व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 11:06 IST

Bhagwant Mann : भगवंत मान यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते राजकारण आणि सरकारचा अर्थ सांगताना दिसत आहेत.

नवी दिल्ली : पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत (Punjab Assembly Election) आम आदमी पार्टीला (AAP)प्रचंड बहुमत मिळाले आहे. आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान (Bhagwant Mann) 16 मार्च रोजी पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.  यापूर्वी 13 मार्च रोजी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान अमृतसरमध्ये रोड शो करणार आहेत. 

दरम्यान, भगवंत मान यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते राजकारण आणि सरकारचा अर्थ सांगताना दिसत आहेत. भगवंत मान राजकारणात येण्यापूर्वी विनोदी कलाकार होते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भगवंत मान यांच्यासोबत नवज्योत सिंग सिद्धूही दिसत आहेत. भगवंत मान यांच्या विनोदावर नवज्योत सिंग सिद्धू हसताना दिसत आहे.

भगवंत मान यांनी असा सांगितला सरकारचा अर्थ...दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ द ग्रेट लाफ्टर चॅलेंज शोमधील आहे. या व्हिडिओमध्ये भगवंत मान स्टँडअप कॉमेडी करत आहेत. यामध्ये भगवंत मान यांनी म्हटले आहे की, "मी एका नेत्याला विचारले की, साहेब, हे काय राजकारण आहे, तेव्हा त्यांनी सांगितले की, राजकारण म्हणजे राज्य कसे करायचे याचे धोरण बनवत राहणे. मग मी त्यांना विचारले की हे राजकारण आहे तर सरकारचा अर्थ काय, तर त्यांनी सांगितले की प्रत्येक मुद्द्यावर विचार करून 1 मिनिटानंतर विसरणे याला सरकार म्हणतात"

निवडणुकीत दिग्गजांचा पराभवया व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका ट्विटर युजरने लिहिले की मला वाटते की स्टँडअप कॉमेडीमध्ये भविष्य उज्ज्वल आहे, जसे आपण युक्रेनमध्ये पाहिले आहे. दरम्यान, पंजाब विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच आम आदमी पार्टीने भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने 117 पैकी 92 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, नवज्योतसिंग सिद्धू, प्रकाशसिंग बादल आणि अमरिंदर सिंग यांच्यासह अनेक दिग्गजांचा आम आदमी पार्टीच्या उमेदवारांकडून पराभव झाला आहे. 

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Aam Admi partyआम आदमी पार्टी