शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

भगवंत मान 'या' दिवशी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; केजरीवालांची घेतली भेट! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 16:59 IST

Punjab CM Oath Ceremony : पंजाब विधानसभा निवडणुकीत भगवंत मान यांचा धुरी मतदारसंघातून 58,206 मतांनी विजय झाला आहे.

नवी दिल्ली : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या (आप) मोठ्या विजयानंतर आता 16 मार्च रोजी भगवंत मान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी 13 मार्च रोजी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान अमृतसरमध्ये रोड शो करणार आहेत.  भगवंत मान सध्या दिल्लीत असून त्यांनी आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आप नेते राघव चढ्ढा देखील उपस्थित होते.

पंजाब विधानसभा निवडणुकीत भगवंत मान यांचा धुरी मतदारसंघातून 58,206 मतांनी विजय झाला आहे. राष्ट्रीय राजधानीला रवाना होण्यापूर्वी संगरूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मान म्हणाले की, पंजाब निवडणुकीत पार्टीच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी मी केजरीवाल यांची भेट घेणार आहे. नवांशहर जिल्ह्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे मूळ गाव खटकर कलान येथे शपथविधी सोहळा होणार आहे.  याचबरोबर, आम आदमी पार्टीच्या दणदणीत विजयाबद्दल भगवंत मान म्हणाले, "जनतेने अहंकारी लोकांना पराभूत केले आणि त्यांनी सर्वसामान्यांना विजयी केले."

राज्यातील विधानसभेच्या 117 पैकी 92 जागा आम आदमी पार्टीने जिंकल्या आहेत. त्यामुळे आता पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार बनणार आहे. निवडणुकीपूर्वीच आम आदमी पार्टीकडून भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, नवज्योतसिंग सिद्धू, प्रकाशसिंग बादल आणि अमरिंदर सिंग यांच्यासह अनेक दिग्गजांचा  आम आदमी पार्टीच्या उमेदवारांकडून पराभव झाला आहे. पराभवानंतर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. मात्र, राज्यपालांनी त्यांना नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री पदावर कायम राहण्याचे आवाहन केले आहे. 

सरकारी कार्यालयात आता मुख्यमंत्र्यांचा फोटो नसणारमुख्यमंत्री झाल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी शहीद भगत सिंग आणि डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे फोटो लावले जातील. भगत सिंग यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. तर बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे राज्यातील प्रत्येक कार्यालयात मुख्यमंत्र्याऐवजी शहीद भगत सिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावले जातील, असे भगवंत मान यांनी निवडणुकीआधी म्हटले होते. त्यानुसार याबाबतचा निर्णय भगवंत मान घेणार का? हे पाहावे लागणार आहे. 

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Aam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल