शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Bhagwant Mann "गन आणि गँगस्टर कल्चर दाखवल्यावर कडक कारवाई होणार", भगवंत मान यांचा गायकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 10:30 IST

Bhagwant Mann On Punjabi Singers: हिंसेला प्रोत्साहन देणारे गाणे तयार केल्यावर कारवाई होणार, असा इशारा CM भगवंत मान यांनी पंजाबी गायकांना दिला आहे.

Bhagwant Mann On Punjabi Singers: भगवंत मान (Bhagwant Mann) पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यापासून एका पाठोपाठ एक मोठ निर्णय घेताना दिसत आहेत. यातच आता मान यांनी पंजाबी गायकांना कडक शब्दात इशारा दिलाय. गाण्यांमध्ये 'गन कल्चर' आणि 'गँगस्टर कल्चर' दाखवल्यावर कारवाई होईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

पंजाबींचा आदर करा - भगवंत मानबहुतांशी पंजाबी गाणी बंदूक आणि गुंड संस्कृतीला प्रोत्साहन देतात, त्यावर भगवंत मान यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी पंजाबी गायकांना इशारा दिला की, त्यांनी या गन क्लचरची ​​जाहिरात करणे थांबवावे. तसेच गाण्यातून कोणत्याही प्रकारे द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नये, असेही सांगितले. यासोबतच, गायकांना त्यांच्या गाण्यात पंजाब आणि पंजाबींचा आदर करण्याचे आवाहन केले. गाण्यांद्वारे हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या अशा गायकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

माजी मुख्यमंत्री अमरिंदर यांचाही विरोध होताभगवंत मान यांनी ड्रग्जच्या मुद्द्यावर डीजी आणि एसएसपी यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा मुद्दा मांडला. गेल्या वर्षी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी एका पंजाबी गायकाच्या अटकेचे समर्थन केले होते. तो त्याच्या गाण्यांमध्ये बंदूक आणि गुंड संस्कृतीचा प्रचार करायचा.

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाब