शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Bhagwant Maan: 'CM भगवंत मान दारुच्या नशेत होते, म्हणूनच विमानातून खाली उतरवले', सुखबीर सिंग बादलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 15:39 IST

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जास्त दारू प्यायल्याने जर्मनीतील एअरलाइन्सने विमानातून उतरवल्याचा दावा करण्यात येतोय.

मोहाली: शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Maan) यांच्याबाबत धक्कादायक दावा केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लुफ्थांसा एअरलाइन्समधून खाली उतरवण्यात आल्याचा दावा बादल यांनी केला आहे. यांच्या म्हणण्यानुसार, सीएम मान यांनी जास्त दारू प्यायल्याने एअरलाइन्सने हे पाऊल उचलले. मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत बादल यांनी हा दावा केला आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवल्याच्या बातम्या निराधार असल्याचे म्हटले आहे.

भगवंत मान नुकतेच जर्मनीला गेले होते. सुखबीर बादल यांनी ट्विट केले की, 'पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लुफ्थांसा एअरलाइन्समधून खाली उतरवण्यात आले. सहप्रवाशांच्या हवाल्याने काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हे दावे केले जात आहेत. मान यांच्यामुळे विमानाला चार तास उशीर झाला. हा रिपोर्ट जगभरातील पंजाबींना लाजवेल असा आहे.' ते पुढे म्हणाले की, 'धक्कादायक बाब म्हणजे पंजाब सरकार मुख्यमंत्र्यांबाबतच्या अशा रिपोर्टवर मौन बाळगून आहे. अरविंद केजरीवाल यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे. पंजाबी आणि राष्ट्रीय अभिमानाची बाब असल्याने भारत सरकारने पावले उचलली पाहिजेत. जर मान यांना विमानातून खाली उतरवले असेल, तर भारत सरकारने यावर जर्मन अधिकाऱ्यांसोबत चर्चा करायला हवी.' दुसरीकडे ब्रिकम सिंह मजिठिया यांनीही या प्रकरणी भगवंत मान यांची खरडपट्टी काढली आहे.

भाजप खासदाराचा टोला विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी या वृत्तांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सीएम भगवंत मान प्रवास करण्याच्या स्थितीत नसल्यामुळे त्यांना फ्रँकफर्टमध्ये उतरवण्यात आल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. त्यांनी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे हा मुद्दा मांडण्याची मागणी केली आहे. भाजप खासदार परवेश वर्मा यांनी ट्विट करून म्हटले की, भगवंत मान यांनी केजरीवाल यांना भारतात आणि परदेशात दारूला हात लावणार नाही असे वचन दिले होते.

'आप'ने आरोप फेटाळलेआपचे प्रवक्ते मलविंदर सिंग कांग यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, 'मुख्यमंत्री त्यांच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार दिल्लीला परतले, हे आरोप निराधार आहेत. मुख्यमंत्री मान यांनी 18 सप्टेंबर रोजी जर्मनीहून फ्लाइट घेतली होती, 19 सप्टेंबरला ते दिल्लीला परतले. विरोधकांनी केलेले आरोप निराधार आणि खोटा प्रचार आहे.'

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबGermanyजर्मनी