शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Bhagwant Maan: सात वर्षानंतर मुला-मुलीची भेट, दोघांना पाहून मुख्यंमंत्री भगवंत मान झाले भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 19:48 IST

भगवंत मान आणि त्यांच्या पत्नीचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असून, दोन्ही मुले आईसोबत अमेरीकेत राहतात.

चंडीगड: काल(16 मार्च) पंबाजचे निवनिर्वाचित मुख्यमंत्री भगवंत मान यांचा शपथविधी सोहळा पार पडला. शहीद भगत सिंग यांच्या गावी झालेल्या शपथविधी सोहळ्यात 3-4 लाख लोक उपस्थित होते. दरम्यान, या सोहळ्यात भगवंत मान यांची तब्बल 7 वर्षानंतर मुलांची भेट झाली. मुलगा आणि मुलीला भेटून मान भावनाविवश झालेले पाहायला मिळाले. मान आणि त्यांच्या पत्नीचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असून, दोन्ही मुले आईसोबत अमेरीकेत राहतात.

मान यांना 17 वर्षीय मुलगा दिलशान असून, तो बास्केटबॉलचा खेळाडू आहे. तर, मुलगी सीरत 21 वर्षांची आहे. दोघेही अमेरिकेत शिक्षण घेतात. वडील मुख्यमंत्री होणार असल्याचे वृत्त कळताच ते अमेरिकेहून पंजाबमध्ये आले. शपथविधी समारंभाच्या वेळी मान मुलगा-मुलीला कडकडून भेटले.यापूर्वी 2014 मध्ये मान, पत्नी इंदरप्रीत कौर व दोन्ही अपत्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी एकत्र दिसले होते. इंदरप्रीत कौर यांनी मान यांचा प्रचारही केला होता. त्यानंतर दोघांमधील अंतर वाढले व इंदरप्रीत कौर दोन्ही अपत्यांना घेऊन विदेशात गेल्या होत्या.

मान यांची आई हरपाल कौर यांनाही नातू व नातीला पाहून आनंद झाला. कुटुंबापासून वेगळे झाल्याचे मानसिक दु:ख मान यांनी सहन केले. परंतु त्यावेळी त्यांची आई व बहीण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या होत्या. राजकारणात सतत भरारी घेणारे मान अनेक ठिकाणी आपले दु:ख व्यक्त करीत होते. मुले आपल्याबरोबर नसल्याची खंतही त्यांना नेहमी वाटते. राजकारणात एवढा व्यग्र झालो की, मागील सात वर्षांना आपल्या मुलांना कधी भेटू शकलो नव्हतो, असे ते नेहमी म्हणायचे.

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२