Bhabanipur By Election Result : भवानीपूरमध्ये ममतांचा मोठा विजय, 58 हजार मतांनी भाजपचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 02:38 PM2021-10-03T14:38:42+5:302021-10-03T14:39:53+5:30

ममतांनी भाजपच्या प्रियंका टिब्रेवाल यांचा 58832 मतांनी पराभव केला. ममतांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचा विषय बनली होती.

Bhabanipur By Election Result: Mamata Banerjee wins in Bhawanipur, BJP loses by 58,000 votes | Bhabanipur By Election Result : भवानीपूरमध्ये ममतांचा मोठा विजय, 58 हजार मतांनी भाजपचा पराभव

Bhabanipur By Election Result : भवानीपूरमध्ये ममतांचा मोठा विजय, 58 हजार मतांनी भाजपचा पराभव

googlenewsNext

भवानीपूर - भवानीपूर - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा जागेसाठी झाले पोटनिवडणुकीत जबरदस्त विजय मिळविला आहे. ममतांनी भाजपच्या प्रियंका टिब्रेवाल यांचा 58832 मतांनी पराभव केला. ममतांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचा विषय बनली होती. या पोट निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना एकूण 84709 मतं मिळाली. तर भाजपच्या प्रियंका टिब्रेवाल यांना 26320 मतं मिळाली. तर सीपीएम उमेदवार श्रीजीब यांना केवळ 4201 मतेच मिळू शकली.

भाजप उमेदवार प्रियंका टिब्रेवाल यांनी आपला पराभव स्वीकारत म्हटले आहे, मी पराभव स्वीकार करते. पण, मी न्यायालयात जात नाही. ते लोक म्हणत होते, की ममता 1 लाख मतांनी जिंकतील. पण त्यांना जवळपास 50 हजार मते मिळाली आहेत. मी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करते. मात्र, त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक जिंकली, ते सर्वांनीच पाहिले आहे. 

ममतांचा केंद्रावर निशाणा, समर्थकांचे मानले आभार -
भवानीपूरमधील विजयानंतर ममता बॅनर्जी लोकांना संबोधित करताना म्हणाल्या, या विजयासाठी मी सर्वांचे आभार मानते. ममता म्हणाल्या, भवानीपूरमध्ये 46 टक्के गैरबंगाली मतदार आहेत, प्रत्येकाने मला मतदान केले. यावेळी ममतांनी केंद्रावरही निशाणा साधला. एवढ्या लहानशा विधानसभा मतदारसंघासाठीही 3.5 हजार केंद्रीय दलाचे जवान तैनात करण्यात आले. आमच्या विरुद्ध षडयंत्र रचले गेले. त्यांनी नंदीग्राममध्ये झालेल्या पराभवाचा उल्लेख करत, हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे, त्यामुळे त्यावर काहीही बोलणार नाही, पण इथे काय झाले, हे लोकांनी पाहिले आहे, असेही ममता म्हणाल्या.

पोटनिवडणुकीतील विजयानंतर जल्लोष करू नका, निवडणूक आयोगाचे ममता सरकारला निर्देश -
पश्चिम बंगालमध्ये तीन विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वी निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र लिहून कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करण्याचे निर्देश दिले आहेत. याच बरोबर, निकाल आल्यानंतर राज्यात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये, यासाठी कडक उपाय योजना आखण्यात याव्यात, असे या पत्रात सांगण्यात आले आहे. तत्पूर्वी, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्या घटनांसाठी भाजपने टीएमसी समर्थकांना जबाबदार धरले होते.

Web Title: Bhabanipur By Election Result: Mamata Banerjee wins in Bhawanipur, BJP loses by 58,000 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.