शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या समर्थनामुळे जेडीयूत फूट, शरद यादव व अली अनवर करणार बंडखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 17:15 IST

बिहारमधली महाआघाडी फिस्कटल्यानंतर भाजपासोबत सरकार बनवणारे नितीश कुमार यांच्याविरोधात पक्षांतर्गतच राजकारण सुरू झालं आहे. नितीश कुमार यांच्यावर नाराज असलेले आमदार बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.

ठळक मुद्देजेडीयूचे नेते शरद यादव आणि अली अनवर बंडखोरी करणार आहेतशरद यादव आज संध्याकाळी अली अनवर आणि पार्टीच्या इतर असंतुष्ट नेत्यांची बैठक घेणार आहेतशरद यादव यांच्या बंडखोरीच्या पवित्र्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रिपदही दिलं जाऊ शकतं

ऑनलाइन लोकमतपटना, दि. 27 - बिहारमधली महाआघाडी फिस्कटल्यानंतर भाजपासोबत सरकार बनवणारे नितीश कुमार यांच्याविरोधात पक्षांतर्गतच राजकारण सुरू झालं आहे. नितीश कुमार यांच्यावर नाराज असलेले आमदार बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. तसेच जेडीयूचे नेते शरद यादव आणि अली अनवर या बंडखोरांना स्वतःच्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.शरद यादव हे नितीश कुमारांच्या शपथविधी सोहळ्यालाही उपस्थित राहिले नव्हते. त्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतल्याचंही खात्रीलायक वृत्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद यादव आज संध्याकाळी अली अनवर आणि पार्टीच्या इतर असंतुष्ट नेत्यांची बैठक घेणार आहेत. शरद यादव यांच्या निवासस्थानी संध्याकाळी 5 वाजता होणा-या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. शरद यादव यांच्या बंडखोरीच्या पवित्र्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रिपदही दिलं जाऊ शकतं. जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी आज या सर्व प्रकारावर मीडियासमोर उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. शरद यादव म्हणाले होते, नितीश कुमार यांनी सरकार बनवण्याचा निर्णय खूपच घाईघाईत घेतला होता. एवढ्या लवकर महाआघाडी तोडून भाजपाच्या समर्थनानं सरकार बनवण्याच्या निर्णयाचं मी समर्थन करू शकत नाही. 2013ला भाजपाशी युती तुटल्यानंतर शरद यादव यांनी भाजपावर उघड हल्लाबोल केला होता. तर जेडीयूचे खासदार अली अनवर यांनीही अंतरात्म्याचा आवज ऐकून नितीश कुमाराच्या निर्णयाला समर्थन देऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे. जेडीयू प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले, पक्षाचा हा निर्णय सर्वांच्या संमतीनं घेण्यात आला आहे. ज्यांना या निर्णयावर नाराजी आहे, त्यांनी पक्षाच्या बैठकीत तो मुद्दा उपस्थित केला पाहिजे होता. भाजपासोबत सरकार बनवल्यामुळे नितीश कुमार आरजेडी आणि काँग्रेस यांच्या रडारवर आहेत. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मी न्यायालयीन लढाई लढत आहे. पण मला शिक्षा सुनावताना घाई करण्यात आली. नितीश कुमार आणि भाजपाने रचलेलं हे षडयंत्र होतं', असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला. 'नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बिहारमधून बाहेर काढण्यासाठी लोकांनी भाजपाविरोधात जाऊन आम्हाला कौल दिला होता. गोमांस खाल्लं पाहिजे असं मी सांगितल्याचा खोटा प्रचार करण्यात आला, आम्ही जिंकलो तर पाकिस्तानात फटाके फुटतील असंही सांगण्यात आलं होतं', अशी माहिती लालूप्रसाद यादव यांनी दिली. नितीश कुमार खूप मोठे संधीसाधू असल्याचा आरोपही त्यांनी केला.  

दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हे प्लानिंग सुरु असल्याची आम्हाला माहिती होती, आपल्या स्वार्थासाठी एखादी व्यक्ती काहीही करु शकते असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. 

'बिहारच्या जनतेने जातीयवादाविरोधात लढा देण्यासाठी नितीश कुमार यांच्या हाती सत्ता दिली होती. मात्र आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली आहे. खरं सांगायचं तर गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हे प्लानिंग सुरु असल्याचं आम्हाला माहित होतं. आपल्या स्वार्थासाठी एखादी व्यक्ती काहीही करु शकते', असं राहुल गांधी यांनी सांगितलं. 'भारतामधील राजकारणात हीच मोठी समस्या आहे की, सत्तेसाठी व्यक्ती काहीही करतो. कोणताही नियम नाही, विश्वासार्हता नाही', असंही राहुल गांधी बोलले आहेत.