शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

BH Number: आता जुन्या वाहनांनाही मिळणार ही खास सुविधा, रस्ते वाहतूक मंत्रालयाचा मोठा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 10:50 IST

BH Series Number Plate: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बीएच (BH) मालिकेतील नंबर्सबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता जुन्या वाहनांवरही बीएच सीरिजचे नंबर घेता येणार नाही. मात्र त्यासाठी मंत्रालयाने नियम आणि अटी लागू केल्या आहेत.

नवी दिल्ली - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बीएच (BH) मालिकेतील नंबर्सबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता जुन्या वाहनांवरही बीएच सीरिजचे नंबर घेता येणार नाही. मात्र त्यासाठी मंत्रालयाने नियम आणि अटी लागू केल्या आहेत. या नियमांच्या आधारावरच बीएच सीरिजचा मिळू शकेल. त्यासाठी संबंधित नोटिफिकेशन मंत्रालयाने जारी केले आहे. 

आतापर्यंत नवी गाडी खरेदी करतानाच बीएच क्रमांकासाठी अर्ज केला जाऊ शकत होता. बीएच नंबरसाठी साधारण क्रमांकाच्या तुलनेत अधिक कर द्यावा लागतो. आतापर्यंत जर तुमच्याकडे जुनी गाडी असेल किंवा जुनी गाडी खरेदी करत असाल तर तुम्हाला बीएच सिरिजचा नंबर मिळू शकत नव्हता. मात्र मंत्रालयाच्या निर्णयानंतर आता भविष्यात जुने वाहन खरेदी करणाऱ्यांनाही बीएच सिरीजचा नंबर घेता येणार आहे. या निर्णयामुळे लाखो लोकांना दिलासा मिळणार आहे. सध्या प्रवास करत असताना दुसऱ्या राज्यातील नंबरप्लेट दिसल्यास वारंवार अडवले जाते. मात्र बीएच नंबर घेतल्यानंतर अशा प्रकारे अडवले जाणार नाही.

असे आहेत नियम- जुन्या गाडीवर त्याच व्यक्तीला बीएच सीरिजचा नंबर मिळेल, जी व्यक्ती अर्जाचे नियम आणि त्याच्या अटी पूर्ण करेल. म्हणजेच संबंधित व्यक्तीची नोकरी ट्रान्सफर होणारी असावी.- वाहनाची विक्री करताना बीएच नंबर  एका मालकाकडून दुसऱ्या मालकाकडे हस्तांतरित करता येऊ शकेल. मात्र त्यानेही अटींची पूर्तता केलेली असावी. जर अटींची पूर्तता झाली नाही तर बीएच नंबर मिळणार नाही. - बीएच नंबर हा केवळ खासगी वाहनांसाठीच मिळणार आहे. व्यावसायिक वापराच्या वाहनांवर हा नियम लागू होणार नाही. 

मंत्रालयाच्या या निर्णयामुळे ज्यांची नोकरी बदली होणारी आहे, अशा लोकांना दिलासा मिळणार आहे. लष्कर आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. कारण त्यांच्या बदल्या ह्या संपूर्ण देशभरात होत असतात. हे लोक मोठ्या प्रमाणावर जुन्या गाड्या खरेदी करतात. बदली झाल्यावर वारंवार एनओसी घेऊन दुसऱ्या राज्यामध्ये वाहनांची नोंदणी करावी लागेल. मात्र मंत्रालयाच्या या निर्णयामुळे भविष्यात यापासून सुटका होणार आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीcarकारIndiaभारत