शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
2
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
3
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
4
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
6
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
7
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
8
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
9
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
10
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
12
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
13
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
14
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
15
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
16
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
17
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
18
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
19
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
20
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार

पाकिस्तानी आणि चिनी सुंदर मुलींपासून सावध राहा, गुप्तचर यंत्रणांचा भारतीय लष्कर अधिका-यांना अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 13:44 IST

'सुंदर तरुणी अधिका-यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्वाची गुपित माहिती मिळवू शकतात', असा इशारा गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आला आहे

नवी दिल्ली - भारतीय लष्कर अधिका-यांना चिनी आणि पाकिस्तानी सुंदर महिलांच्या जाळ्यात अडकू नका असा अलर्ट गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणेने भारतीय सरकारला इशारा देत सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे. 'सुंदर तरुणी अधिका-यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्वाची गुपित माहिती मिळवू शकतात', असा इशारा गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणेचा हा अलर्ट व्हॅलेंटाइन डेच्या आधी आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI ला भारतीय हवाई दलाची गुप्त माहिती पोहोचवल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह यांना अटक केल्याचनंतर आला आहे. 

इंटर स्टेट इंटलिजन्स (ISI) या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारतीय हवाई दलाविषयीची गोपनीय माहिती पोहोचविल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी गुरुवारी ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह यांना अटक केली आहे. गुप्तचर यंत्रणेच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'चांगल्या दिसणा-या चिनी आणि पाकिस्तानी तरुणी आपल्या सुरक्षा अधिका-यांना हनी ट्रॅपमध्ये फसवू शकतात'. अरुण मारवाह यांच्या अटकेनंतर अलर्ट जारी करत सुरक्षा अधिका-यांना हनी ट्रॅपमध्ये अडकू नका असा आदेशच देण्यात आला आहे. 

केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षांत सुरक्षेशी संबंधित निवृत्त अधिका-यांसोबत एकूण 13 अधिका-यांना पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. 

तरुणीचा विश्वास जिंकताना असे अडकले अरुण मारवाह‘तू कुणी तोतया नाहीस आणि भारतीय वायुदलात ग्रुप कॅप्टन आहेस, यावर मी कसा बरे विश्वास ठेवू,’ असा प्रश्न स्वत:ला मॉडेल म्हणवून घेणा-या महिमा पटेलने कॅप्टन अरुण मारवाह यांना फेसबुक चॅटिंग करताना विचारला. सुंदर तरुणीने आपल्याविषयी शंका घ्यावी, हे अरुण मारवाह यांना रुचले नाही. त्यांचा इगोच जणू दुखावला. त्यामुळे तिचा विश्वास जिंकण्यासाठी ते हवाई दलाशी संबंधित अतिमहत्त्वाची माहिती तिला देत ते पाकिस्तानी आयएसआयच्या जाळ्यात अलगद अडकले.

फेसबुक चाललेले चॅटिंग महिमाच्या नावाने आयएसआय एजंट करीत होते. पोलीस आता महिमा पटेल व किरण रंधावा याही फेसबुक अकाऊंटची पडताळणी करीत आहेत. किरण रंधावा या अकाऊंटवरूनही त्यांना अनेक मेसेज आलेले आहेत. मारवाह यांनी मोबाइलमधील मेसेज डिलीट केले असले तरी पोलीस ते मिळवण्याचा प्ऱयत्नात आहेत. पोलीस खात्याकडून फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपच्या व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार सुरु केला आहे. चॅटिंगच्या विश्लेषणातून या अधिकाºयाने कोणती माहिती आ़यएसआयला कळविली, हे कळू शकेल. ते मेसेज अधिकाºयाविरोधात पुरावा म्हणून उपयोगी ठरतील.

मारवाह यांनी एका मॉडेलला एक सीम कार्ड खरेदी करुन पाठवले होते. पोलीस या कंपनीच्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडून माहिती मिळवत आहेत. तसेच महिमा व किरण या फेसबुक अकाऊंटसाठी ज्या मुलींचे फोटो वापरले गेले आहेत, त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत.