शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

"...यावरून काँग्रेस आरक्षण संपवणार हे स्पष्ट", राहुल गांधींच्या वक्तव्यावर मायावती संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 13:15 IST

BSP supremo Mayawati : मायावती म्हणाल्या, खरंतर काँग्रेसची सुरुवातीपासूनच आरक्षणविरोधी विचारसरणी आहे.

BSP supremo Mayawati : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन सध्या राजकीय खळबळ उडाली आहे. भाजपच्या सर्व नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. आता बसपा प्रमुख मायावती यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रात दीर्घकाळ सत्तेत असताना काँग्रेस पक्षाच्या सरकारने ओबीसी आरक्षण लागू केले नाही. आता देशात जातीय जनगणना न करणारा हा पक्ष आता सत्तेत येण्याचे स्वप्न पाहत आहे. त्यांच्या नाटकाबद्दल जागरुक राहा, जे भविष्यात कधीही जात जनगणना करू शकणार नाहीत, असे मायावती म्हणाल्या.

आता काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या या नाटकापासून सावध राहा, त्यांनी परदेशात म्हटले आहे की, जेव्हा भारताची स्थिती चांगली असेल तेव्हा आम्ही एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण संपवू. यावरून काँग्रेस वर्षानुवर्षे त्यांचे आरक्षण संपवण्याचे कारस्थान करत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे मायावती यांनी सांगत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या या जीवघेण्या वक्तव्यापासून या वर्गातील लोकांनी सावध राहावे, कारण हा पक्ष केंद्रात सत्तेवर येताच या विधानाच्या नावाखाली निश्चितपणे त्यांचे आरक्षण संपवेल. संविधान आणि आरक्षण वाचवण्याचे नाटक करणाऱ्या या पक्षाचे भान या लोकांना असलेच पाहिजे, असेही मायावती म्हणाल्या.

पुढे मायावती म्हणाल्या, खरंतर काँग्रेसची सुरुवातीपासूनच आरक्षणविरोधी विचारसरणी आहे. केंद्रातील त्यांच्या सरकारमध्ये त्यांचा आरक्षणाचा कोटा पूर्ण झाला नाही, तेव्हा या पक्षाकडून न्याय न मिळाल्याने बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांनी कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला. लोकांनी सावध राहावे. तसेच, एकंदरीत, जोपर्यंत देशातून जातिवाद पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत भारताची स्थिती तुलनेने चांगली असूनही या वर्गांची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती सुधारणार नाही. त्यामुळे जातीयवाद पूर्णपणे नष्ट होईपर्यंत आरक्षणाची योग्य घटनात्मक व्यवस्था चालू ठेवणे आवश्यक असल्याचे मायावती यांनी सांगितले.

काय म्हणाले राहुल गांधी?दरम्यान, जातिनिहाय जनगणना आणि आरक्षण या दोन मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मागच्या काही दिवसांपासून कमालीचे आक्रमक आहेत. दरम्यान, सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार? या एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोठं विधान केलं आहे. जेव्हा भारतात आरक्षणाच्या दृष्टीने समानता असेल, तेव्हाच काँग्रेस पक्ष देशामधील आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत विचार करेल. सध्यातरी अशी स्थिती नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

टॅग्स :mayawatiमायावतीRahul Gandhiराहुल गांधीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेस