शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर मदत मागणारे, टीका करणाऱ्यांवर कारवाई केल्यास खबरदार - सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 06:20 IST

सरकारला दिली तंबी, केंद्रानेच सर्वांचे लसीकरण करण्याचा विचार करावा

नवी दिल्ली : ऑक्सिजनची कमतरता, व्यवस्थेतील त्रुटी आणि केंद्र-राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव अशा अनेक मुद्यांवरून सर्वोच्च न्यायालयानेकेंद्र सरकारवर ताशेरे ओढताना केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर न्यायालयाने बोट ठेवले आहे.  एवढेच नव्हे तर १०० टक्के लसीचे डोस केंद्र सरकारच विकत का घेत नाही, असा प्रश्नही न्यायालयाने केला आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सोशल मीडियावर मदतीबाबत पोस्ट करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये, असा इशारा देतानाच सरकारविरोधात अफवा पसरविण्याच्या नावाखाली नागरिकांवर कारवाई केल्यास न्यायालयाच्या आदेशाची अवमानना मानली जाईल, अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १० मे रोजी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने देशातील कोरोना स्थितीबाबत दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर  सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघाडणी केली. सोशल मीडियावर ऑक्सिजन, बेड, औषधी इत्यादींची मदत मागणारे किंवा केंद्र तसेच राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांवर अफवा पसरविण्याच्या नावाखाली गप्प करण्याच्या कृतीवरून न्यायालयाने सरकारला तंबी दिली आहे.

नागरिकांचा आवाज आपण ऐकायला हवा. अशा लोकांवर कारवाई केल्यास न्यायालयाची अवमानना मानली जाईल, अशा इशारा न्यायालयाने केंद्र सरकारसह सर्व राज्य सरकार तसेच पोलीस महासंचालकांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांना विचार करून टिप्पणी करण्याचा सल्लाही दिला आहे. न्यायालयाने केलेली टिप्पणी सोशल मीडियामध्ये व्हायरल होते. पण, आम्ही कुणाच्या विरोधात आहोत किंवा कुणाचे भय आहे, असा अर्थ होत नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

आरोग्य यंत्रणा अपुरी

सुनावणीदरम्यान न्या. डी. वाय. चंद्रचूड म्हणाले, की कोरोनाचे उपचार करणारे फ्रंटलाईन डॉक्टर्स आण‍ि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही उपचारासाठी बेड मिळत नाहीत. गेल्या ७० वर्षांमध्ये उभारण्यात आलेली आरोग्य यंत्रणा अपुरी असून सध्याची परिस्थिती भीषण आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. 

लसीकरणावरून खडे बोल

न्यायालयाने लसीकरणाच्या मुद्यावरून सरकारला खडे बोल सुनावले. गोरगरीब जनता लसीकरणासाठी पैसे मोजू शकणार नाही. गरीब व अशिक्षित लोक ऑनलाईन नोंदणी कशी करू शकतील, असा प्रश्न उपस्थित करताना न्यायालयाने मागासवर्गीयांचे काय, त्यांना खासगी रुग्णालयांच्या दयेवर सोडून द्यावे लागेल का, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. 

१००% लसी केंद्राने विकत घ्याव्या...

n न्यायालयाने लसीच्या वेगवेगळ्या दरावरून सवाल केला आहे. केंद्र असो किंवा राज्य, लसी जनतेसाठीच असल्यामुळे वेगवेगळे दर का ठेवण्यात आले, ५० टक्के लसी राज्यांना कधी उपलब्ध होणार, असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले. लसीचा पुरवठा करताना कोणत्या राज्याला किती लसीचे डोस मिळणार, हे लस उत्पादकांना ठरविण्याची परवानगी देता येणार नाही. 

टॅग्स :Courtन्यायालयSocial Mediaसोशल मीडियाCentral Governmentकेंद्र सरकार