शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

गरोदर बहिणीसह आई-वडिलांना मारून घरात पुरले; कारण ऐकून पोलिसही चक्रावले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 18:33 IST

Man Killed Mother Father And Sister: हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलिसांना तिघे बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

Man Killed Mother Father And Sister: कर्नाटकची राजधानी बंगळुरूतील विजयनगर परिसरात घडलेल्या एका तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. एका तरुणाने आपल्या आई, वडील आणि गरोदर बहिणीची हत्या करून त्यांचे मृतदेह घरातच पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

कौटुंबिक वादातून तिहेरी हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय याने बहिणीच्या वैयक्तिक आयुष्यावरून निर्माण झालेल्या वादातून हे कृत्य केले. आरोपीची 18 वर्षीय बहीण अमृता हिचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते, ज्यातून ती गरोदर झाली. बहिणीच्या या स्थितीला आई-वडिलांनीही पाठिंबा दिला. याचाच राग मनात धरून आरोपीने तिघांची हत्या केली. पोलिस चौकशीत आरोपीने कुटुंबाच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

हत्या कशी घडली? 

पोलिस तपासानुसार 26 जानेवारी रोजी आरोपीने आधी आईची हत्या केली आणि रक्ताने माखलेले कपडे नष्ट करून आंघोळ केली. त्याच दिवशी संध्याकाळी बहीण अमृता घरी आल्यानंतर तिची हत्या केली आणि मृतदेह आईजवळ ठेवून पुन्हा आंघोळ केली. रात्री साडेदहा वाजता  दारू पिऊन घरी परतल्यानंतर सोफ्यावर बसलेल्या वडिलांचाही गळा चिरून खून केला आणि तिन्ही मृतदेह एकाच खोलीत ठेवून दाराला कुलूप लावले.

मृतदेह पुरण्याची योजना

आरोपी दुसऱ्या दिवशी बहिणीचा व आईचा मोबाईल घेऊन बंगळुरूला गेला. जयदेव रुग्णालयाजवळ फोटो काढून ते मोबाईलवर पाठवले आणि दोन्ही फोन कचऱ्यात टाकून दिले. यानंतर त्याने काका वसंत यांना भेटून सर्व घटना सांगितली. पुढे काकांनीच मृतदेह पुरण्याची आणि कुटुंब बेपत्ता असल्याचे भासवण्याची कल्पना दिली.

घरातच खड्डा खणून मृतदेह पुरले

27 जानेवारीच्या रात्री आरोपी परत कोट्टुरूला आला आणि घरातच खड्डा खणून आई-वडील आणि बहिणीचे मृतदेह पुरले. यानंतर तो पोलिस स्टेशनला गेला आणि तिघे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. मात्र पोलिसांना त्याच्यावरच संशय आल्याने, त्याची कसून चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिली. याप्रकरणी आरोपी अक्षय आणि त्याचा काका वसंत या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Man Murders Family, Buries Them at Home; Police Shocked

Web Summary : Bengaluru man killed his mother, pregnant sister, and father over family disputes, burying them inside their house. He confessed to the crime, citing family honor as the motive. Police arrested him and his uncle, who helped conceal the crime.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBengaluruबेंगळूरHonor Killingऑनर किलिंग