शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बंगाली मॉडेल मंजुषाची आत्महत्या, 15 दिवसांत तीन अभिनेत्रींनी आयुष्य संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 11:10 IST

पंधरा दिवसांत तीन अभिनेत्रींनी आयुष्य संपविले

कोलकाता : मंजुषा नियोगी या बंगाली माॅडेल व अभिनेत्रीने कोलकाता येथील आपल्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या दोन दिवस आधी मंजुषाची मैत्रीण बिदिशा डे मुजुमदार या अभिनेत्रीनेदेखील आत्महत्या केली होती. गेल्या पंधरा दिवसांत बंगाली चित्रपटसृष्टीतील तीन अभिनेत्रींनी आपले आयुष्य संपविले आहे. 

कोलकातामधील पाटुली भागात राहत असलेली मंजुषा नियोगी ही आपली मैत्रीण बिदिशा डे मुजुमदार हिच्या आत्महत्येने अस्वस्थ होती. तिला खूप निराशा आली होती. त्यामुळेच तिने आत्महत्या केली असावी, असे मंजुषाच्या आईने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मंजूषाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. शुक्रवारी सकाळी मंजुषा आपल्या खोलीबाहेर आली नाही, तेव्हा तिच्या पालकांनी तिला कॉल केला; पण ती फोन उचलत नसल्याने ते तिच्या खोलीत गेले. तेव्हा गळफास घेतलेल्या अवस्थेत मंजुषाचा मृतदेह सापडला. कांची या टीव्ही मालिकेत तिने नुकतीच नर्सची भूमिका केली होती. (वृत्तसंस्था)

बिदिशाचे जोडीदाराशी झाले मतभेदबिदिशा डे मुजुमदार ही मॉडेल व अभिनेत्री मेकअप तसेच इतर गोष्टींच्या जाहिरातींमधील प्रसिद्ध चेहरा होता. कोलकाता येथील डमडम भागातील एका घरात तिचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह बुधवारी संध्याकाळी आढळून आला होता. बिदिशाचे तिच्या जोडीदाराशी काही मतभेद झाले होते. त्यामुळे ती गेले काही दिवस अस्वस्थ होती. 

लिव्ह-इन-पार्टनरशी झाले भांडणदि. १५ मे रोजी पल्लवी डे या अभिनेत्री व मॉडेलचा मृतदेह तिच्या कोल फ्लॅटमध्ये सापडला होता. पल्लवीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर पल्लवीचा लिव्ह-इन-पार्टनर साग्निक चक्रवर्ती याला पोलिसांनी अटक केली. पल्लवीची हत्या करण्यात आली, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला. साग्निक हा विवाहित होता. मात्र तो सध्या पल्लवीसोबत राहत होता. या दोघांमध्ये सतत भांडणे होत असत, असे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालcinemaसिनेमा