दिल्लीकरांना १ मार्चपासून वीज-पाणी मोफत योजनेचा लाभ

By admin | Published: February 25, 2015 05:45 PM2015-02-25T17:45:50+5:302015-02-25T17:45:50+5:30

१ मार्चपासून दिल्लीकरांना २० हजार लीटर पाणी मोफत तसेच ४०० युनीटपर्यंत वीजेचा वापर करणा-या ग्राहकांना वीजबिलामध्ये ५० टक्के कपातीचा लाभ मिळणार आहे.

Benefits of electricity-free water scheme from March 1 to March 1 | दिल्लीकरांना १ मार्चपासून वीज-पाणी मोफत योजनेचा लाभ

दिल्लीकरांना १ मार्चपासून वीज-पाणी मोफत योजनेचा लाभ

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दिल्लीकरांना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता पुढील महिन्यापासून लागू होणार असून १ मार्चपासून दिल्लीकरांना २० हजार लीटर पाणी मोफत तसेच ४०० युनीटपर्यंत वीजेचा वापर करणा-या ग्राहकांना वीजबिलामध्ये ५० टक्के कपातीचा लाभ मिळणार आहे. या दोन्ही बाबींची घोषणा आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एका पत्रकार परिषदेत केली.
दिल्ली विधानसभा निवडणूक लढविणा-या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टींने दिल्लीत वीज व पाणी मोफत दिले जाईल असे दिल्लीकरांना निवडणूक जाहिरनाम्यात वचन दिले होते. आपने दिलेल्या वचनाला दिल्लीकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला व दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'ला ७० जागापैकी तब्बल ६७ जागेवर विजय मिळवून देत दिल्लीची एकहाती सत्ता सोपवली.

Web Title: Benefits of electricity-free water scheme from March 1 to March 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.