नवी दिल्ली : ‘ओला’ टॅक्सीच्या एका चालकाने बेल्जियन प्रवासी महिलेचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी रात्री राजधानी दिल्लीत घडली. या टॅक्सी चालकाला रविवारी पोलिसांनी अटक केली. दरम्यान, केजरीवाल यांच्या राज्यात दिल्ली महिलांसाठी अधिकच असुरक्षित होत असल्याची टीका काँग्रेस आणि भाजपाने केली आहे.विनयभंगाची ही घटना सीआर पार्क भागात घडली. राज सिंग असे टॅक्सी चालकाचे नाव असून, तो राजस्थानचा राहणारा आहे. त्याला अटक करून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
बेल्जियन महिलेचा दिल्लीत विनयभंग
By admin | Updated: May 9, 2016 03:15 IST