शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम असल्यामुळेच आम्हाला टार्गेट केलं जातंय- ओवैसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 17:51 IST

तेलंगणा- हैदराबादेत एका जनसभेला संबोधित करताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

तेलंगणा- हैदराबादेत एका जनसभेला संबोधित करताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राजस्थानातील राजसमंद येथील हत्याकांडाचा हवाला देत असदुद्दीन ओवैसींनी मोदींना लक्ष्य केलं आहे. भाजपा सत्तेत आल्यापासून मुस्लिमांवरील हल्ल्यांच्या घटना वाढतायत. मुस्लिमांसह अल्पसंख्याकांवर निशाणा साधला जातोय. मुस्लिम असल्यामुळे आमच्यासोबत असा दुजाभाव केला जातोय, असंही ओवैसी म्हणाले आहेत.राजस्थानातील राजसमंद येथील एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाला होता. या व्हिडीओत शंभूलाल रेगर नामक व्यक्ती एका मुस्लिम व्यक्तीवर पाठीमागून हल्ला करताना पाहायला मिळतंय. त्यानंतर त्या व्यक्तीला जिवंत पेटवण्यात आलं. शंभूलालनं लव्ह जिहाद रोखण्यासाठी असं केल्याचं सांगत सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला होता. पोलिसांनी शंभूलाल या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकारावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. हत्या करण्यात आलेला माणूस हा पश्चिम बंगालमधील मालदा येथे वास्तव्याला होता. त्यानंतर त्या मुस्लिम व्यक्तीच्या कुटुंबीयांना पश्चिम बंगाल आणि राजस्थान सरकारनंही मदत जाहीर केली आहे.गेल्या काही दिवसांपासून भाजपाशासित राज्यांत अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या आकडेवारीनुसार, देशभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांत प्रत्येक एक लाख दलित लोकसंख्येमागे 20 प्रकरणे दाखल झाली. मध्य प्रदेश, राजस्थान आणि गोवा ही राज्ये त्यात पुढे असून, यानंतर बिहार व गुजरात आहेत.मध्य प्रदेशात प्रति एक लाख दलित लोकसंख्येत 43.4 प्रकरणे, राजस्थानात 42, गोव्यात 36.7, बिहारमध्ये 34.4 आणि गुजरातमध्ये 32.5 प्रकरणे दाखल करण्यात आली. मध्य प्रदेशात एकूण 4,922 प्रकरणे दाखल झाली. राजस्थानात 5134 प्रकरणे दाखल झाली. गोव्यात दलितांवरील अत्याचारांची 11 प्रकरणे दाखल झाली असली तरी ते प्रमाण प्रति एक लाख लोकसंख्येमागे 36.7 आहे. चौथ्या क्रमांकावर बिहार आहे. बिहारमध्ये एक वर्षात 5,701 प्रकरणे दाखल झाली. देशातील एकूण प्रकरणात हे 14 टक्के आहे. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी