शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
2
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
3
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
4
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
5
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
6
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
7
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव
8
Video - "मला माफ करा..."; तिकीट नाकारल्यानंतर ढसाढसा रडला नेता, व्यक्त केलं दु:ख
9
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
10
सासरेबुवा घरी घेऊन आले २ सूना; लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच झाल्या गायब अन्... समोर आलं धक्कादायक सत्य
11
Video : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा, भेटीचं कारण काय?
12
दर महिना ७० हजार सॅलरी पण हाती शिल्लकच राहत नाही; टेक प्रोफेशनल युवकानं शेअर केला अनुभव
13
Platinum Investment: सोने-चांदीच्या किंमती आवाक्याबाहेर, प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करणे चांगला पर्याय आहे का?
14
Video: हायकोर्टच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान वकीलाचा महिलेला Kiss; व्हिडिओ व्हायरल...
15
Virat Kohli Property: विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?
16
VIRAL : बाब्बो! ९३व्या वर्षी बाबा झाला हा व्यक्ती; बायको ५६ वर्षांनी लहान! लगेच दुसऱ्या बाळाचाही विचार केला सुरू
17
Virat Kohli: "ज्यावेळी तुम्ही हार मानता..." किंग कोहलीची पोस्ट चर्चेत; जाणून घ्या सविस्तर
18
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
19
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
20
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...

२०१७ पूर्वी १६ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणे बलात्कार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 08:33 IST

अपीलावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने नमूद केले की, मुलीच्या आई-वडिलांच्या साक्षीतून ‘बहकवून नेणे’ सिद्ध होत नाही. मुलगी स्वतःच्या मर्जीने आरोपीसोबत गेल्याचे व विवाहानंतर दोघे काही काळ एकत्र राहत होते, हे तिच्याच जबाबातून स्पष्ट होते.

अलाहाबाद : १५ वर्षांहून अधिक वयाच्या अल्पवयीन पत्नीशी वैवाहिक नात्यानंतर शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने या आधारे २००७ मध्ये दिलेली एकाची शिक्षा रद्द केली.

न्यायमूर्ती अनिल कुमार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने ‘इंडिपेंडंट थॉट विरुद्ध युनियन ऑफ इंडिया’ (२०१७) या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७५ मधील अपवाद क्र. २ चे स्पष्टीकरण बदलले होते. या अपवादात १५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवणे हा बलात्कार ठरत नाही, असे म्हटले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये ते बदलून ‘१८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पत्नीशी” असे स्पष्ट केले. हा बदल फक्त भविष्यात लागू होईल, असा स्पष्ट आदेश दिला होता. त्यामुळे २०१७ पूर्वी घडलेल्या घटनांवर तो लागू होणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

प्रकरण काय? या प्रकरणात संबंधित घटना २००५ सालची आहे. तक्रारीनुसार, आरोपीने १६ वर्षांच्या मुलीला पळवून नेऊन तिच्याशी निकाह केला आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. सत्र न्यायालयाने आरोपीला कलम ३६३ (अपहरण), ३६६ (जबरदस्तीने विवाहासाठी प्रवृत्त करणे) व ३७६ (बलात्कार) कलमान्वये दोषी ठरवले होते.

उच्च न्यायालयाचे म्हणणे...अपीलावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने नमूद केले की, मुलीच्या आई-वडिलांच्या साक्षीतून ‘बहकवून नेणे’ सिद्ध होत नाही. मुलगी स्वतःच्या मर्जीने आरोपीसोबत गेल्याचे व विवाहानंतर दोघे काही काळ एकत्र राहत होते, हे तिच्याच जबाबातून स्पष्ट होते. त्यामुळे कलम ३६३ आणि ३६६ अंतर्गत गुन्हा ठरत नाही, असे न्यायालयाने म्हटले.तसेच न्यायालयाने स्पष्ट केले की, मुस्लिम कायद्यानुसार विवाहासाठी किमान वय १५ वर्षे आहे, तर बालविवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ नुसार ते १८ वर्षे आहे. मात्र पोक्सो कायदा इतर कायद्यांवर वरचढ ठरतो. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने केलेला बदल २०१७ पासून लागू असल्याने, २००५ मधील घटनेसाठी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा लावता येत नाही, असे स्पष्ट करून न्यायालयाने शिक्षा रद्द केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Pre-2017, sex with 16+ wife was not rape: Court

Web Summary : Allahabad HC: Sex with a wife over 16 before 2017 isn't rape. A 2007 conviction was overturned, citing a Supreme Court ruling that changes apply prospectively. The case involved a 2005 incident of marriage and intercourse with a 16-year-old.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय