ओडिशा सरकारने गुरुवारी (२२ जानेवारी) सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने एक मोठा आणि अत्यंत धाडसी निर्णय घेतला आहे. राज्यात आता बिडी, सिगरेट, गुटखा, तंबाखू, खैनी आणि जर्दा यांसह सर्व प्रकारच्या अमली पदार्थांवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. केवळ विक्रीवरच नाही, तर या पदार्थांचे उत्पादनावर, पॅकेजिंगवर आणि वितरणावरही बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
बंदी घालण्यात आलेल्या उत्पादनांची यादी अशी - या निर्णयानुसार, गुटखा, पान मसाला, जर्दा, खैनी यांसारख्या सर्व तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असेल. तसेच, फ्लेवर्ड किंवा सुगंधी चघळण्याचे पदार्थ, पॅकेज्ड आणि सुटी तंबाखू, आणि ज्या खाद्यपदार्थांमध्ये तंबाखू किंवा निकोटीनचा अंश आहे, अशा सर्व उत्पादनांवर ही बंदी लागू असेल. महत्वाचे म्हणजे, आता वेगवेगळ्या पाकिटात विकले जाणारे मात्र एकत्र करून सेवन केले जाणारे पदार्थही राज्यात बेकायदेशीर ठरतील.
बंदीचं मुख्य कारण काय? -आरोग्य विभागाने म्हटले आहे की, तंबाखू आणि जर्दा यांचे सेवन हे कर्करोगाचे सर्वात मोठे कारण आहे. ओडिशामध्ये स्मोकलेस तंबाखू वापरणाऱ्यांचे प्रमाण ४२ टक्क्यांहून अधिक आहे, जे राष्ट्रीय सरासरीच्या दुप्पट आहे. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर आणि WHO ने देखील या पदार्थांना कर्करोगजन्य मानले आहे. यामुळे तोंड, घसा, पोट आणि फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका प्रचंड वाढतो, ज्याचा सर्वाधिक फटका तरुण पिढीला बसत आहे.
हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि एफएसएसएआय (FSSAI) च्या नियमांनुसार घेण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी सहकार्य करावे आणि ओडिश 'तंबाखूमुक्त' बनवण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही सरकारने केले आहे. ओडिशा कर्करोग मुक्त करण्याच्या दिशेने हे सरकारचे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
Web Summary : Odisha government banned all tobacco products, including gutkha and cigarettes, to combat rising cancer rates. The ban covers production, packaging, and distribution, aiming to create a tobacco-free state and protect its youth, following FSSAI guidelines.
Web Summary : ओडिशा सरकार ने बढ़ते कैंसर को रोकने के लिए गुटखा और सिगरेट सहित सभी तंबाकू उत्पादों पर प्रतिबंध लगा दिया है। प्रतिबंध में उत्पादन, पैकेजिंग और वितरण शामिल हैं, जिसका उद्देश्य एफएसएसएआई दिशानिर्देशों का पालन करते हुए तंबाकू मुक्त राज्य बनाना और युवाओं की रक्षा करना है।